AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐकावं ते नवलच!, रात्री झोपली थेट 9 वर्षांनी उठली!, आईचा झाला होता मृत्यू, वाचा ‘स्लिपिंग गर्ल’बद्दल…

एलेन सॅडलर ही मुलगी एका रात्री अशाप्रकारे झोपली की 9 वर्षांपासून ती झोपेतून उठू शकली नाही. ही तरूणी रात्री झोपली ती थेट 9 वर्षांनतर जागी झाली. ही मुलगी झोपली तेव्हा तिचं वय 12 वर्षे होतं आणि ती जेव्हा उठली तेव्हा तिचं वय 21 वर्षे झालेलं होतं.

ऐकावं ते नवलच!, रात्री झोपली थेट 9 वर्षांनी उठली!, आईचा झाला होता मृत्यू, वाचा 'स्लिपिंग गर्ल'बद्दल...
रात्री झोपली थेट 9 वर्षांनी उठली
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Apr 06, 2022 | 12:04 PM
Share

मुंबई : चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र जर एखादी व्यक्ती चक्क 9 वर्ष झोपली तर… तुम्हाला हे खरं वाटणार नाही, अशी घटना घडली असल्याचं सांगितलं जातंय. ब्रिटनमध्ये (Britain) 150 वर्षांपूर्वी एक घटना घडली. त्यामुळे जगाला आश्चर्याचा धक्का बसला. एलेन सॅडलर (Ellen Sadler) ही मुलगी एका रात्री अशाप्रकारे झोपली की 9 वर्षांपासून ती झोपेतून उठू शकली नाही. ही तरूणी रात्री झोपली ती थेट 9 वर्षांनतर जागी झाली. ही मुलगी झोपली तेव्हा तिचं वय 12 वर्षे होतं आणि ती जेव्हा उठली तेव्हा तिचं वय 21 वर्षे झालेलं होतं. जेव्हा ती झोपेतून उठली तेव्हा तिच्या आईचा मृत्यू झाला होता. या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या घटनेपासून तिला ‘झोपाळू मुलगी’ (Sleeping Girl) अशी ओळख मिळाली. Medium.Com या साईटने याविषयचीचं वृत्त प्रसारित केलं आहे.

Medium.Com च्या रिपोर्टनुसार, 15 मे 1859 रोजी इंग्लंडमध्ये एलेन सॅडलर नावाच्या मुलीचा जन्म झाला. तिला एकूण 12 भावंडे होती. मुलीचे कुटुंब तुरविले नावाच्या गावात राहत होते. हे गाव ऑक्सफर्ड आणि बकिंगहॅमशायरच्या मधोमध वसलेलं आहे. या मुलीच्या जन्माच्या वेळी सगळं काही ठीक होते. परंतु जेव्हा ही मुलगी 12 वर्षांची झाली, तेव्हा एका रात्री ती झोपली ते थेट 9 वर्षांनी उठली. तिच्या या विचित्र झोपेमुळे जगभरातील डॉक्टर आश्चर्यचकित झाले. जेव्हा ही मुलगी झोपोतून उठत नव्हती तेव्हा तिचा मृत्यू झाला असावा असं कुटुंबियांना वाटं परंतू तिचा श्वासोच्छवास सुरू होता. त्यामुळे ताबडतोब तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. तेव्हा खूप प्रयत्न करूनही डॉक्टर काही करू शकले नाहीत. तेव्हा त्यांनी सांगितलं की ही मुलगी शितनिद्रा अवस्थेत गेली आहे.

उठली तेव्हा आईचा मृत्यू

ही मुलगी 9 वर्षांनंतर जेव्हा उठली तेव्हा तिच्या आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. जेव्हा ती झोपली तेव्हा ती 12 वर्षांची होती आणि जेव्हा ती उठली तेव्हा ती 21 वर्षांची होती. मात्र, जेव्हा मुलीला जाग आली तेव्हा तिची आई मरण पावली होती.

टीप- टीव्ही 9 मराठी आपल्यापर्यंत केवळ माहिती पोहोचवत आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही.

संबंधित बातम्या

ST : आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद देणारी आणि घेणारी माणसं; पोस्ट वाचून म्हणाल, ‘अशी माणसं आजूबाजूला हवीत’

Viral Video : लग्नमंडपात रडायला लागला नवरदेव, नवरीला आलं हसू, शेवट अगदी गोड

Video : पोरगा गांज्याच्या आहारी गेला, आईने खांबाला बांधून डोळ्यात मिरची पावडर टाकली…

Follow Us
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!
INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? राऊतांनी दिले मोठे संकेत
Sanjay Raut UNCUT | INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? संजय राऊतांनी दिले मोठे संकेत
मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
Kolhapur | चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींची पसंती, तरीही हुकली संधी.....
Ashok Gehlot | काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींची पसंती, तरीही हुकली संधी; अशोक गेहलोत यांचा मोठा गौप्यस्फोट!