AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: चिकन घशात अडकलं, दम घुटला, जीव जाणार, तितक्यात एकाने प्राण वाचवले!

खरं तर, हा मुलगा या रेस्टॉरंटमध्ये चिकन सँडविच खातो आणि त्यादरम्यान त्याच्या घशात चिकनचा तुकडा अडकतो.

Video: चिकन घशात अडकलं, दम घुटला, जीव जाणार, तितक्यात एकाने प्राण वाचवले!
चिकनचा तुकडा गळ्यात अडकला
| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 1:56 PM
Share

सोशल मीडिया हे असं व्यासपीठ आहे, जिथं कोणतीही गोष्ट येताच व्हायरल होते. इंटरनेटवर अनेक मजेदार आणि भितीदायक व्हिडिओ पहायला मिळतात. सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे. जो अतिशय धक्कादायक आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. त्याचा हा व्हिडिओ एका रेस्टॉरंटचा आहे, ज्याचा व्हिडिओ तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. हा भयानक व्हिडिओ व्हायरल हॉग या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शननुसार, ही घटना अमेरिकेतील विस्कॉन्सिनमधील ऑगस्ट महिन्याची आहे. (Viral Video Boy chokes on chicken sandwich on throght Viral video shows how a man saved him)

आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, जोसेफ रेनहार्टने स्थानिक रेस्टॉरंटमध्ये एका मुलाचा जीव वाचवला. क्लिपमध्ये एका मुलाच्या गळ्यात चिकनचा तुकडा अडकतो. खरं तर, हा मुलगा या रेस्टॉरंटमध्ये चिकन सँडविच खातो आणि त्यादरम्यान त्याच्या घशात चिकनचा तुकडा अडकतो. व्हिडिओमध्ये जोसेफ रेनहार्ट मुलाचा जीव वाचवण्यासाठी कठोर परिश्रम करतो आणि शेवटी तो यशस्वी होतो. आता हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

व्हिडिओ शेअर करताना पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जोसेफ रेनहार्टने स्थानिक बार आणि रेस्टॉरंटमध्ये एका मुलाचा जीव वाचवला. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय तो माणूस चिकन सँडविचचा मोठा तुकडा बाहेर काढतो. व्हिडिओमध्ये दिसणारी महिला ही त्या मुलाची आई आहे जी आपल्या मुलाचा जीव वाचवताना दिसत आहे. व्हिडिओतील दुसरी महिला 911 वर कॉल करत आहे, कारण तो माणूस तिला वाचवत आहे.

पाहा व्हायरल होणारा धोकादायक व्हिडिओ-

हा व्हिडिओ पोस्ट केल्यापासून 2,500 हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. नेटिझन्सनी त्या माणसाच्या मनाच्या उपस्थितीचे कौतुक केले आणि त्याला हिरो म्हटलं आहे. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, ‘पिवळा टी-शर्ट घातलेला हा व्यक्ती खरा हिरो आहे’, दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘असे लोक क्वचितच आढळतात, जे एखाद्याचा जीव वाचवतात’ तिसऱ्या यूजरने लिहिले की, ‘मी हे यापूर्वी केले आहे. अनेक व्हिडिओ, तरीही ते जीव वाचवू शकले नाहीत’ याशिवाय आणखी एका यूजरने लिहिले की, ‘हा व्हिडिओ खरोखर धोकादायक आहे’

हेही पाहा:

Video: टेन्शन को मारो गोली, बन्ताय की ‘चटपट’ बोली, डिप्रेशन घालवणारे मुंबईच्या चिमुरड्यांच्या चटपट गँगचे व्हिडीओ!

Elon Musk: “मी विसरतो तुम्ही अजूनही जिवंत आहात”, इलॉन मस्कने बड्या अमेरिकन नेत्याला लिहिलेल्या एका वाक्यामूळे होतेय जगभर टीका

 

मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.