AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : तरूणींनी दांडिया खेळला , फोटो काढले अन् ड्रेस केले रिटर्न, डिलिव्हरी वाल्याकंडे रिटर्न पार्सलचा जमला ढीग

नवारात्रीत तरूणीनी ऑनलाईन साईट्सवरून महागडे कपडे मागवले, त्यावर गरबा खेळला फोटो काढले आणि दुसऱ्या दिवशी तो ड्रेस रिटर्न पार्सल मध्ये रिटर्नही केला. या रिटर्न आलेल्या पार्सलचा डिलिव्हरी बॉईजकडे खच जमला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video : तरूणींनी दांडिया खेळला , फोटो काढले अन् ड्रेस केले रिटर्न, डिलिव्हरी वाल्याकंडे रिटर्न पार्सलचा जमला ढीग
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 17, 2026 | 3:43 PM
Share

नवरात्री आली की नवीन चनीयाचोळी, कुरते घ्यायचे, छान गुजरातीसारखं तयार व्हायचं आणि फोटो काढायचा हा तर ठरलेला कार्यक्रम…पण यंदाच्या गरब्यात तरूणींनी असं काही केलंय की डिलिव्हरी वाल्यांच्या डोक्याला ताप झालाय.

कारण तरूणांनी गरबा खेळण्यासाठी ऑनलाईन साईटवरून महागडे कपडे मागवले. गरबा खेळले. फोटोही काढले आणि दुसऱ्याच दिवशी त्या त्या डिलिव्हरी साईट्सवर ते कपडे रिटर्न केलेत. हे चूक आहे की बरोबर ते माहित नाही पण तरूणांनी महागडे कपडे खरेदी करण्यापासून किंवा कपड्याचे महागडे भाडे देण्यापासून वाचण्यासाठी तरूणांनी ही नामी शक्क्ल लढवली आहे. पण हीच शक्कल डिलिव्हरी बॉईजच्या डोक्याला ताप झाली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक पार्सलचे ढिग दिसत आहेत. काही पार्सल बाईकवर ठेवलेले आहेत. तर काही जमिनीवर पडलेले दिसतात. हा व्हि़डिओ एका डिलिव्हरी एजंटने बनवल्याचं सांगितलं. तिथे इतर डिलिव्हरी बॉईज देखील परत आलेली पार्सल घेण्यासाठी जमलेले दिसतात.किती पार्सल रिटर्न आणले असा प्रश्न विचारला असता कोणी 20,कोणी 25, तर कोणाकडे तब्बल 50 पार्सल रिटर्न आली आहेत.

ऑनलाईन खरेदीत कपड्यांचा आकार चुकींच असणं, रंग खराब असणं किंवा खराब कपडे मिळणं. अशा कारणांसाठी रिटर्नची सुविधा महत्त्वाची आहे. पण प्रत्येकाने जर अशा पद्धतीने याचा वापर केला तर ते चुकीचेच आहे. कारण यामुळे विक्रेत्याला जोरदार फटका बसू शकतो. कपडे पाठवण्याचा खर्ज, परतीची वाहतूक यासगळ्या खर्चावर ताण पडतो.

व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्स च्या माध्यमातून आपलं मत लिहिलं आहे. एक जण म्हणतोय की असं वागणं म्हणजे चीटींग करण्यासारखं आहे. तर कोणी म्हणतंय तु्मच्या एका दिवसाच्या आनंदासाठी तुम्ही किती लोकांचं नुकसान करत आाहात. तर तिसरा म्हणतोय कपड्याच्या महागड्या भाड्यापासून वाचण्यासाठी केलेली ही आयडिया चांगली आहे.

या व्हिडिओवरून असा दावा केला जातोय की, काही जणांनी दांडियासाठी कपडे ऑनलाईन मागवले, ते घालून कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि नंतर ते परत केले. मात्र व्हिडिओत दिसणाऱ्या पार्सलमध्ये नेमकं काय आहे. किंवा प्रत्येत कपडा वापरूनच परत केला आहे का याची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला