Video : गोरिलाची पासष्ठी, केक खात 65 वा वाढदिवस साजरा, हॅपी बर्थ डे गोरिला!

Viral Video: सध्या एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये एक गोरिला त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. हा व्हीडिओ एका नेटकऱ्याने शेअर केला आहे. हा त्याचा 65 वा वाढदिवस साजरा केल्याचं सांगण्यात आलं आहे.

Video : गोरिलाची पासष्ठी, केक खात 65 वा वाढदिवस साजरा, हॅपी बर्थ डे गोरिला!
गोरिलाचा 65 वा वाढदिवस
| Updated on: Apr 15, 2022 | 3:08 PM

मुंबई : सोशल मीडियावर फनी आणि चर्चा व्हावी असे व्हीडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ आहे गोरिलाचा (Gorilla). गोरिलाचा वाढदिवस साजरा होताना तुम्ही पाहिला आहे का? नसेल तर हा व्हीडिओ जरूर बघा… या व्हीडिओमध्ये एक गोरिला त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. हा व्हीडिओ एका नेटकऱ्याने शेअर केला आहे. हा त्याचा 65 वा वाढदिवस (Gorilla 65th Birthday) साजरा केल्याचं सांगण्यात आलं आहे. गोरिला सहसा सरासरी 35 ते 40 वर्षे जगतात. पण हा व्हीडिओ 65 व्या वाढदिवसाचा आहे. त्यामुळे त्याचं वय पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

गोरिलाचा 65 वा वाढदिवस

सध्या एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये एक गोरिला त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. हा व्हीडिओ एका नेटकऱ्याने शेअर केला आहे. हा त्याचा 65 वा वाढदिवस साजरा केल्याचं सांगण्यात आलं आहे. गोरिला सहसा सरासरी 35 ते 40 वर्षे जगतात. पण हा व्हीडिओ 65 व्या वाढदिवसाचा आहे. त्यामुळे त्याचं वय पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

व्हिडिओमध्ये दिसणार्‍या गोरिलाचं फतोउ नाव असं आहे. तो साधारणपणे गोरिला जगतात त्याहून जास्त वेळ जगला असल्याचा दावा केला जात आहे. हा गोरिला बर्लिन प्राणीसंग्रहालयातील आहे. या प्राणीसंग्रहालयाच्या वतीने त्याचा वाढदिवस हटके पद्धतीने साजरा करण्यात आला. हा व्हीडिओ बर्लिन प्राणी संग्रहालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

गोरीलाच्या बर्थडेला केकचा बेत

फतोउ या गोरिलाचा 65 वा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा करण्यात आला. माणसांप्रमाणे त्याच्या वाढदिवसाला केक आणण्यात आला होता. आता समोर केक आणि त्यात बर्थडे म्हटल्यालवर गोरिलानेही हा केक फस्त केला. त्याचा हा केक खातानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

Ranbir Alia Wedding : अमूलकडून आलिया रणबीरला ‘बधाई हो!’, मिस्टर ॲण्ड मिसेस कपूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Video : अंगावरून अख्खी रेल्वे गेली पण पोरीने फोनवर बोलणं सोडलं नाही!, व्हीडिओ पाहून काळजात धस्स होईल…

कोळ्याचं जाळं अन् दव बिंदूने कोल्हापूरच्या प्रज्वल चौगुलेला दिली आंतरराष्ट्रीय ओळख, पाहा नेमकं काय झालं?