AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranbir Alia Wedding : अमूलकडून आलिया रणबीरला ‘बधाई हो!’, मिस्टर ॲण्ड मिसेस कपूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांना अमूलच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. कार्टून पोस्टरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात. पट्ट मंगनी भट्ट ब्याह, असं कॅप्शन देत अमूलने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Ranbir Alia Wedding : अमूलकडून आलिया रणबीरला 'बधाई हो!', मिस्टर ॲण्ड मिसेस कपूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
आलिया रणबीरला अमूलकडून शुभेच्छा
| Updated on: Apr 14, 2022 | 7:11 PM
Share

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) लग्नबंधनात (Ranbir Alia Wedding) अडकले आहेत. आलिया आता कपूरांची सून झाली आहे. मुंबईतल्या ‘वास्तू’ या निवासस्थानी हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला मोजक्या पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं. कपूर आणि भट्ट कुटुंबातील मोजकेच जण लग्नाला उपस्थित होते. लग्नाला उपस्थित असलेल्या 50 जणांपैकी 20 जण हे रणबीर-आलियाचे सर्वांत खास आणि जवळचे होते. या दोघांना अमूलच्या (Amul) वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पट्ट मंगनी भट्ट ब्याह, असं कॅप्शन देत अमूलने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अमूलकडून शुभेच्छा

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांना अमूलच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. कार्टून पोस्टरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात. पट्ट मंगनी भट्ट ब्याह, असं कॅप्शन देत अमूलने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जेवणात काय-काय?

लग्नातील मेन्यू हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. रणबीर-आलियाच्या लग्नाच्या मेन्यूमध्ये कोणकोणते पदार्थ आहेत, याबाबतची माहिती समोर आली आहे. या मेन्यूमध्ये खास आलिया आणि रणबीरसाठी  त्यांच्या डाएटनुसार पदार्थ ठेवण्यात आले आहेत.तंदुरी चिकन, दाल मखनी यांसारखे पदार्थ पाहुण्यांसाठी असून मीडिया रिपोर्ट्सनुसार आलियासाठी खास वेगन बर्गर बनवण्यात आला आहे. आलिया आणि तिची खास मैत्रीण अनुष्का रंजन या दोघींना वेगन बर्गर खूप आवडतं. त्यानुसार वेगन बर्गर मेन्यूमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. भारतीय पदार्थांशिवाय काही फ्जुयन फूड आणि सुशीसुद्धा सर्व्ह करण्यात येणार आहेत. रणबीरला सुशी खूप आवडत असल्याने मेन्यूमध्ये सुशी काऊंटर खास समाविष्ट करण्यात आला आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट विवाहबद्ध झाले आहेत. दोघांचं लग्न पार पडताच लग्नसोहळ्यातील फोटो समोर येऊ लागले आहेत. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये करण जोहर हा करीना कपूर आणि करिश्मा कपूरसोबत दिसत आहे.

“रणबीर-आलियाचं लग्न हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. कुटुंबीयांसाठी हा खूप मोठा दिवस आहे. आज चिंटूला (ऋषी कपूर) इथं असायला हवं होतं. त्याची आम्हाला रोज आठवण येते,” अशी प्रतिक्रिया रणधीर कपूर यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना दिली.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाचा रिसेप्शन 16 आणि 17 एप्रिल रोजी होणार होता. मात्र, आता यात मोठा बदल करण्यात आला आहे. कोरिओग्राफर राजेंद्र सिंह उर्फ ​​मास्टरजी यांनी सांगितलं की, हे जोडपे आता त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन आयोजित करणार नाही. लग्नात कपूर आणि भट्ट कुटुंबातील कोणताही सदस्य परफॉर्म करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

Video : डॉल्फिनचा ट्रेनरवर हल्ला, काळजाचा थरकाप उडवणारा व्हीडिओ

Video : भारतीय गाण्यावर न्यूयॉर्कमधल्या टाईम्स स्क्वेअरसमोर ठुमके, लाखो लाईक्स- करोडो व्ह्यूज, व्हीडिओ पाहून तुम्हीही फिदा व्हाल!

Video : रानू मंडलने गायलं कच्चा बदाम गाणं, नवरीच्या लुकमधला व्हीडिओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.