Video : रानू मंडलने गायलं कच्चा बदाम गाणं, नवरीच्या लुकमधला व्हीडिओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?

सध्या एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यात ती नवरीच्या लुकमध्ये कच्चा बदाम हे गाणं गाताना पाहायला मिळत आहे. चौदा सेकंदाचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. रानू मंडल यात लाल रंगाची साडी आणि त्यावर नवरीच्या लुकला साजेसे दागिने घातलेली पाहायला मिळत आहे.

Video : रानू मंडलने गायलं कच्चा बदाम गाणं,  नवरीच्या लुकमधला व्हीडिओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
राणू मंडलने नवरीच्या लुकमध्ये गायलं कच्चा बदाम गाणं
आयेशा सय्यद

|

Apr 14, 2022 | 3:27 PM

मुंबई : कच्चा बदाम (Kacha Badam) हे गाणं ऐकलं नाही, असं क्वचितच कुणी असेल. या गाण्याची अनेकांच्या मनात विशेष जागा आहे. अनेकांना हे गाणं प्रचंड आवडतं अनेकजण यावर रील्सही बनवत असतात. सोशल मीडियावर (Social Media) या बंगाली गाण्याची मोठ्या प्रमाणावर क्रेझ पाहायला मिळतेय. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आता परदेशातही लोक रील्स बनवून हे गाणे शेअर करत आहेत. हे गाणं भुबन बड्याकर तर रातोरात स्टार झाला. सध्या कच्चा बदाम या गाण्याचं नवं व्हर्जन रानू मंडल (Ranu Mandal) ऐकायला मिळतंय. रानू मंडलचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यात ती नवरीच्या लुकमध्ये कच्चा बदाम हे गाणं गाताना पाहायला मिळत आहे.

रानू मंडलचा व्हायरल व्हीडिओ

सध्या एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यात ती नवरीच्या लुकमध्ये कच्चा बदाम हे गाणं गाताना पाहायला मिळत आहे. चौदा सेकंदाचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. रानू मंडल यात लाल रंगाची साडी आणि त्यावर नवरीच्या लुकला साजेसे दागिने घातलेली पाहायला मिळत आहे.

रानू मंडल कोण आहे?

रानू मंडल या महिलेला सोशल मीडियाने ओळख दिली. काही दिवसांआधी ती रेल्वे स्टेशनवर ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गातानाचा तिचा व्हीडिओ व्हायरल झाला. लोकांना रानूचा आवाज आवडला. ती रातोरात स्टार झाली. यानंतर तिला एका गाण्याच्या रिअॅलिटी शोमध्ये आमंत्रित करण्यात आलं. जिथे गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाने तिला आपल्या चित्रपटात गाणं गाण्याची ऑफर दिली. यानंतर हिमेशसोबत रानू यांनी ‘तेरी मेरी कहानी’ गाणं गायलं जे लोकप्रिय झालं. त्यावेळी ती तिच्या मेकअपमुळे ट्रोल झाली. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाल्यानंतर रानू बदलली. असं अनेकांचं म्हणणं होतं.

संबंधित बातम्या

“तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अंमलात आणायची आमचीच लायकी नाही, माफ करा बाबासाहेब!”, हेमांगी कवीची फेसबुक पोस्ट चर्चेत

Video : हात नसताना तरूण बनवतोय नूडल्स, नेटकरी म्हणतात, “बेस्ट कुक इन द वर्ल्ड!”

सातवीत असताना गरदोर, 14 व्या वर्षी बनली आई! आता स्वतःच मुलीला सांगितला गरोदर होण्यामागचा किस्सा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें