IPS Ankita Sharma | अभिनेत्री रवीना टंडणने का केलं IPS अंकिता शर्माचं कौतुक?
आयपीएस अधिकारी असलेल्या अंकिता शर्मा या ट्रेन्ड होण्याचं नेमकं कारण काय? त्यांच्याविषयी इतकी चर्चा का होते आहे? हे जाणून घेऊयात..

आयपीएस ऑफिस अंकिता शर्मा (Ankita Sharma) सध्या सोशल मीडियावर (Social Media) ट्रेंड होते आहे. त्यामागचं कारणंही तितकंच महत्त्वाचं आहे. गेल्या काही दिवसांपासून अंकिता शर्मा यांचे फोटो ट्वीटर (Tweeter), इन्टाग्राम (Instagram) आणि फेसबुकवर (Facebook) चर्चिले जात आहे. आयपीएस अधिकारी असलेल्या अंकिता शर्मा या ट्रेन्ड होण्याचं नेमकं कारण काय? त्यांच्याविषयी इतकी चर्चा का होते आहे? हे जाणून घेऊयात..
कोण आहे अंकिता शर्मा?
अंकिता शर्मा या छत्तीसगडमधील एक महिला आयपीएस अधिकारी आहे. गेल्या काही दिवसांपासून हातात बंदूक घेऊन जंगलात आपल्या पथकाचं नेतृत्त्व करतानाचा त्यांचा फोटो अनेकांनी शेअर केला आहे. अनेक सेलिब्रिटिंना अंकिता शर्मा यांच्या फोटोला शेअर करत त्यांच्याबाबत अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली आहे.
..म्हणून अंकिता शर्मा ट्रेंड होत आहेत!
असं नेमकं अंकिता शर्मा यांनी केलंय तरी काय?, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या अंकिता शर्मा या नक्षलीवादविरोधी राबवण्यात आलेल्या ऑपरेशनचं नेतृत्त्व करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांनी एका नक्षली ऑपरेशनचं नेतृत्त्व केलं होतं. तरुणांसाठी एक आदर्श अधिकारी असलेल्या अंकिता शर्मा या लहानग्यांमध्येही तितक्या लोकप्रिय आहेत. तरुणांनी प्रोत्साहन देणाऱ्या अधिकारी म्हणून त्या ओळखल्या जातात.
बस्तर में पहली बार नक्सल ऑपरेशन की कमान महिला IPS के हाथों में @ankidurg मैम ❤️।
अंकिता मैम वो शख्स हैं, जो खुद अफसर बनने के बाद युवाओं को भी आगे बढ़ाने में कोई कसर नहीं छोड़ती हैं। छोटे बच्चों से भी बहुत प्यार करती है मैम।#IPS #ankitasharmaips#buster #upsc pic.twitter.com/z3yJqZAKID
— shivani vashistha (@Shivani_Mzn) December 27, 2021
रवीनाही भारावली!
अभिनेत्री रवीन टंडणनेही (Raveena Tondon) अंकिता शर्मा यांच्याबाबत अभिमान व्यक्त करत एक ट्वीट -रीट्वीट केलं आहे. रवीना टंडण यांनी म्हटलंय की, अंकित शर्माचा मला भारतीय महिला या नात्यानं अभिमान वाटतो. ती खऱ्या अर्थानं एक नायिका असून, तिच्या रक्तात भारतमातेचं निळ रक्त सळसळतंय.
True Blue Blooded Heroines .. #proudindianwomen?? https://t.co/tBLv3tlEaK
— Raveena Tandon (@TandonRaveena) December 28, 2021
आयपीएस आरजे वीज यांनीहीही अंकिता यांची तारीफ केली आहे. आम्हाला तुझा अभिमान वाटतो, अशा आशयाच्या अनेक कमेंट, रिट्वीट्स सध्या सोशल मीडियावर अंकिता शर्मांच्या फोटोवर अनेकांनी केल्यात.
अंकित शर्मा या सोशल मीडियावरही सक्रिय असतात. ट्वीटरवर त्यांनी आपल्या बायोमध्ये स्वतःची ओळख करुन देताना लिहिलंय की,…Servant for the Civils, Law Enforcement Officer (LEO). An observant & Proud Indian Citizen! फक्त ट्वीटरच नाही, तर इन्टाग्रामवरही अंकिता बऱ्यापैकी सक्रिय आहेत. इन्टाग्रामवर त्यांचे 4 लाखपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
इतर बातम्या –
VIDEO : Salman Khan चालवतोय ऑटोरिक्षा, पनवेलमधला व्हिडिओ Viral
hweta Tiwari | श्वेता तिवारीच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहून माजी पतीनेही केली कमेंट! पाहा काय म्हणाला…
Corona | कपूर परिवारावर कोरोनाचा कहर! अर्जुन, अंशुला, रियासह करण बुलानीला कोरोनाची लागण
Liger Teaser | विजय देवरकोंडा, अनन्या पांडेच्या ‘लायगर’ची पहिली झलक, लवकरच होणार मोठा धमाका!
पाहा व्हिडीओ –