AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: दमदार दाढीची कमाल, 63 किलो महिलेला दाढीने उचलून झाला मालामाल, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव!

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला पुरुषाच्या दाढीला हार्नेसच्या सहाय्याने बांधलेली आहे, सुरुवातीला हे काम बघायला खूप अवघड वाटतं, पण अंतनास त्यात सहज यश मिळवतो.

Video: दमदार दाढीची कमाल, 63 किलो महिलेला दाढीने उचलून झाला मालामाल, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव!
63 किलोच्या महिलेला दाढीने उचलले
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 12:39 PM
Share

सामान्य माणूस प्रसिद्ध होण्यासाठी काय काय करत नाही, कधी कधी त्याचा माणूस आपल्या मजेशीर कृत्यानं लोकांना हसवून प्रसिद्ध होतो, तर अनेक वेळा लोक यासाठी असे काहीतरी करतात. ज्याबद्दल जाणून घेतल्यावर प्रत्येकजण क्षणभर थक्क होतो आणि कधी कधी या लोकांची नावं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Record) नोंदवली जातात. अलीकडच्या काळात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने आपल्या इंस्टाग्रामवर एक अतिशय मनोरंजक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक पुरुष 63 किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या महिलेला दाढीने उचलताना दाखवण्यात आला आहे.

अंतानास कोन्ट्रीमास (Antanas Kontrimas) नावाच्या या व्यक्तीचे कारनामे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत. ज्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले की- ‘अँटानस कॉन्ट्रिमासने दाढीला लटकवून 63.80 किलो वजन उचलले’.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला पुरुषाच्या दाढीला हार्नेसच्या सहाय्याने बांधलेली आहे, सुरुवातीला हे काम बघायला खूप अवघड वाटतं, पण अंतनास त्यात सहज यश मिळवतो. हे करत असताना त्याला खूप वेदनांनाही सामोरे जावे लागले, जे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येते, परंतु या सर्व वेदनांना यश तेव्हा आलं जेव्हा विश्वविक्रम अंतानास कोंट्रिमसच्या नावावर नोंदवला गेला.

हा व्हिडीओ पाहा

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक अवाक झाले. अनेक युजर्सनी या व्हिडिओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. त्याची प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले की, ‘हे खरोखरच एक महान, अद्वितीय टॅलेंट आहे.’ त्याचवेळी, आणखी एका इंस्टाग्राम युजरने लिहिले की, ‘हे लोक कोणती केसांचे कुठले प्रॉडक्ट वापरतात हे माहित नाही.’ याशिवाय इतर अनेक युजर्सनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत.

गेल्या आठवड्यात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या हँडलवर लिन्से लिंडबर्ग Linsey Lindberg नावाच्या महिलेचा एक अनोखा विक्रमही शेअर केला आहे. जिथे तिने आपल्या बायसेपने एका मिनिटात 10 सफरचंद चिरडण्याचा अनोखा विक्रम केला.

हेही पाहा:

Video: माणिके मागे हिते वर बौद्ध भिक्षुंचा भन्नाट डान्स, लोक म्हणाले, संगीताला धर्म आणि भाषा नसते!

Video | केस विस्कटलेले, रस्त्यावर जेवत बसलेली, इंग्रजी बोलणाऱ्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.