AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : 9 वर्षात 7.58 लाख मुंबईकरांनी एमटीएनएलच्या लँडलाईन सेवेस ठोकला रामराम

मागील 9 वर्षात एमटीएनएलच्या सेवेस रामराम ठोकणारे मुंबईकर ग्राहकांची संख्या 7.58 लाख आहे तर त्यात समाधान म्हणजे 3.25 लाख नवीन ग्राहक जोडले गेल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना एमटीएनएल मुंबईने दिली आहे.

Mumbai : 9 वर्षात 7.58 लाख मुंबईकरांनी एमटीएनएलच्या लँडलाईन सेवेस ठोकला रामराम
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Dec 18, 2021 | 7:52 PM
Share

मुंबई : मुंबईत महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, मुंबई म्हणजेच एमटीएनएल लँडलाईनची सेवा आणि दर्जा सुमार घसरला असून त्यात केलेल्या कंत्राटीकरणामुळे ग्राहकाने पाठ फिरवली आहे. मागील 9 वर्षात एमटीएनएलच्या सेवेस रामराम ठोकणारे मुंबईकर ग्राहकांची संख्या 7.58 लाख आहे तर त्यात समाधान म्हणजे 3.25 लाख नवीन ग्राहक जोडले गेल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना एमटीएनएल मुंबईने दिली आहे.

आरटीआयच्या माहितीतील नवी आकडेवारी

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमटीएनएल मुंबईकडे मागील 10 वर्षात लँडलाईन ग्राहकांची संख्या, सरेंडर संख्या आणि नवीन जोडणीची संख्या याची माहिती मागितली होती. अनिल गलगली यांस एमटीएनएल मुंबईच्या उप महाव्यवस्थापक यांनी वर्ष 2013-14 पासून 30 नोव्हेंबर 2021 पर्यंतची माहिती उपलब्ध करुन दिली. मागील 9 वर्षाची आकडेवारी लक्षात घेता सद्यस्थितीत 14,75,547 ग्राहक आहेत. ही संख्या 9 वर्षांपूर्वी 19,40,336 इतकी होती. मागील 9 वर्षात एकूण 7,58,929 ग्राहकांनी सेवेस रामराम ठोकला असला तरी याच कालावधीत 3,25,320 इतके नवीन ग्राहक जोडले गेले. वर्ष 2020-2021 या दरम्यान 1,16,233 ग्राहकांनी लँडलाईन सरेंडर केला आहे.  मागील 2 वर्षांपासून नवीन ग्राहक जोडले गेले असले तरी वर्ष 2020-2021 या दरम्यान फक्त 3998 तर वर्ष 2021-2022 या दरम्यान 2535 इतकी नगण्य संख्या आहे. मागील 2 वर्षात 1,86,477 ग्राहकांने सेवा सरेंडर केली असून फक्त 6533 इतकी नवीन जोडणी करण्यात आली आहे.

सेवेबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी होती

अनिल गलगली यांच्या मते आधीच सेवेबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी होती आणि काही वर्षांत कंत्राटी कामामुळे सेवेचा दर्जा राखण्यात एमटीएनएल मुंबई सपशेल अपयशी ठरले आहे. नवीन भरती आणि सेवेची गुणवत्ता राखली तरच एमटीएनएल मुंबई स्पर्धेत तग धरु शकतो, अशी प्रतिक्रिया देत अनिल गलगली यांनी पंतप्रधान, टेलिकॉम मंत्री यांच्याकडे एमटीएनएल मुंबईला वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

शिवसेनेने कर्नाटक सरकारच्या एसटी बसेसवर “छत्रपती शिवाजी महाराज की जय” लिहून केल्या रवाना…

Navi mumbai : राज्यात सत्तर हजार जणांना रोजगार देणाऱ्या आयटी पार्कचे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

VIDEO : ‘जर्सी’साठी शाहिद कपूरनं गाळलं रक्त आणि घाम! टाके पडल्यानंतरही जोरदार फटकेबाजी!!

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती