
Aadhar Card Update: आधार कार्ड आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कोणत्याही कामासाठी आधारची गरज असते. लहान मुलांपासून वृद्धापर्यंत आधार कार्ड बनवले गेले आहे. परंतु या आधारला काही व्हॅलिडिटी असते का? मग मुदत संपल्यानंतर आधारचे काय होते? परंतु सर्वच आधारला व्हॅलिडिटी नसते. विशिष्ट परिस्थितील आधारला व्हॅलिडिटी आहे. लहान मुलांचे आधार दोन वेळा अपडेट करावे लागतात. परंतु अपडेट केले नाही तर आधार अमान्य होते, असे नाही.
मुलांचे आधार कार्ड दोन वेळा अपडेट करणे गरजेचे आहे. एकदा पाच वर्षांच्या मुदतीत आधार कार्ड अपडेट केले गेले पाहिजे. त्यावेळी आधार कार्डधारकाचे फिंगर प्रिंट्स, डोळ्यांचे बुबुळ आणि फोटो अपडेट केले जाते. दुसऱ्यांदा मुलांचे आधार कार्ड त्याच्या वयाच्या 15 व्या वर्षानंतर अपडेट केले पाहिजे. हे अपडेट करणे सक्तीचे आहे. यामुळे पाचव्या आणि 15 व्या वर्षी आधार अपडेट सरकारने मोफत ठेवले आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही. परंतु इतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागते.
आधार सर्वांना भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच यूआयडीएआयकडून केले जाते. यूआयडीएआय म्हणते, तुम्हाला आधार कार्ड दहा वर्षानंतर अपडेट करणे आवश्यक आहे. परंतु दहा वर्षानंतर आधार अपडेट केले नाही तर ते अमान्य होत नाही. परंतु भविष्यात कोणत्याही अडचणी येऊ नये, यासाठी वेळोवेळी आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. आधार कोणत्याही आधार केंद्रावर जावून अपडेट केले जावू शकतो.
आधार कार्ड हे भारत सरकारने जारी केलेले एक ओळखपत्र आहे. त्याचा वापर ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा आणि विविध सरकारी आणि गैर-सरकारी सेवांसाठी केला जातो. बँकिंग, मोबाइल सिम, सरकारी अनुदाने, कर भरणे आणि इतर अनेक ठिकाणी हे आवश्यक मानले जाते.