गृह कर्जाचे सर्व हप्ते फेडल्यानंतर ‘हे’ काम अवश्य करा, अन्यथा येऊ शकता अडचणीत!

| Updated on: Nov 16, 2022 | 10:02 PM

गृह कर्जाचे हप्ते भरल्यानंतर अनेक जण निश्चिन्त होतात आणि काही महत्त्वाचे कामं करण्याचे हमखास विसरतात.

गृह कर्जाचे सर्व हप्ते फेडल्यानंतर हे काम अवश्य करा, अन्यथा येऊ शकता अडचणीत!
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, आजच्या काळात कर्ज घेऊन घर खरेदी करणे सामान्य झाले आहे. सरकारी आणि खाजगी बँका ग्राहकांना गृहकर्जासह (Home Loan Tips) विविध प्रकारची कर्जे देतात. यामुळे लोकं कर्ज घेऊन स्वत:साठी घर खरेदी करतात किंवा इतर महत्त्वाची कामे पूर्ण करतात. कर्ज घेतल्यानंतर लोकांना त्याची भरपाई ईएमआयच्या रूपात करावी लागते. पण केवळ बँकेला कर्ज फेडून कर्जदाराचे काम संपत नाही. त्यानंतर काही महत्त्वाची कामं आहेत ती पूर्ण न केल्यास तुम्ही अडचणीतदेखील येऊ शकता.

मूळ कागदपत्र परत घ्या

जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल तर कर्जाची पूर्ण परतफेड केल्यानंतर तुमच्या घराची मूळ कागदपत्रे बँकेकडून वापस घ्यायला  विसरू नका. कर्ज घेताना तुमच्या घराची मूळ कागदपत्रे बँकेत जमा केली जातात आणि त्याची  प्रत तुमच्याकडे असते.

जोपर्यंत तुम्ही कर्जाची पूर्ण परतफेड करत नाही तोपर्यंत कागदपत्रे बँकेकडे असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही कर्जाची परतफेड कराल तेव्हा तुमच्या घराची मूळ कागदपत्रे बँकेतून अवश्य परत घ्या. यामध्ये वाटप पत्र, ताबा पत्र आणि विक्री करार यांसारख्या कागदपत्रांचा समावेश असू शकतो.

हे सुद्धा वाचा

NOC अवश्य घ्या

जेव्हा एखाद्या ग्राहकाचे कर्ज बंद होते, तेव्हा त्याला बँकेकडून थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र मिळते. तसेच हे प्रमाणपत्र घेणे अत्यंत गरजेचे आहे. हा पुरावा आहे की, तुम्ही कर्जाची पूर्णपणे परतफेड केली आहे आणि बँकेचे आता तुमचे काहीही देणे बाकी नाही.

क्रेडिट प्रोफाइल अपडेट करा

कर्ज बंद केल्यानंतर तुमची क्रेडिट प्रोफाइल अपडेट केल्याची खात्री करा. जर तुम्हाला भविष्यात कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सामना करावा लागणार नाही. कर्ज बंद करताना हे काम केले नसेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर तपासत राहा. पण क्रेडिट प्रोफाइल लवकर अपडेट करण्याचा प्रयत्न करा.