नवी दिल्ली : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून (RBI) नवं पतधोरण जाहीर करण्यात आलं आहे. नवं पतधोरण जाहीर करताना आरबीआयकडून पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये (Repo Rate) वाढ करण्यात आली आहे. आरबीआयकडून रेपो रेट 50 बेसीस पॉईंटने वाढवण्यात आला आहे. रेपो रेट वाढवण्याची यंदा ही चौथी वेळ आहे. यापूर्वी तीन वेळेस आरबीआयकडून रेपो रेट वाढवण्यात आला आहे. रेपो रेटमध्ये 50 बेसीस पॉईंटची वाढ करण्यात आल्यानं रेपो रेट 5.9 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाई (inflation) नियंत्रणात आणण्यासाठी रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाकडून सातत्याने रेपो रेटमध्ये वाढ करण्यात येत आहे.