AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा आधार ईपीएफ खात्याशी लिंक नाही, मग खात्यात जमा होणार नाहीत पैसे, असे करा लिंक

जर एखाद्या ईपीएफ खाते खातेधारकाच्या आधार क्रमांकाशी लिंक केले नसेल तर त्या कर्मचार्‍यास केवळ एका महिन्याचे ईपीएफ योगदान मिळेल. (If your Aadhaar is not linked to the EPF account, then the money will not be credited to the account)

तुमचा आधार ईपीएफ खात्याशी लिंक नाही, मग खात्यात जमा होणार नाहीत पैसे, असे करा लिंक
तुमचा आधार ईपीएफ खात्याशी लिंक नाही, मग खात्यात जमा होणार नाहीत पैसे
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jul 07, 2021 | 4:20 PM
Share

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्याला आधार क्रमांक लिंक करणे अनिवार्य केले आहे. कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) नियोक्तांना सूचना दिली आहे की ईसीएफ (इलेक्ट्रॉनिक चालान कम रिटर्न) केवळ त्या ईपीएफओ सदस्यांसाठी परवानगी आहे ज्यांचे खाते आधारशी जोडलेले आहे. जर एखाद्याचे ईपीएफ खाते आधार क्रमांकाशी जोडलेले नसेल तर अशा ईपीएफ खात्यात मालकाचे योगदान जमा होणार नाही. ईपीएफओने हेही स्पष्ट केले की ज्यांचे यूएएन आधार क्रमांकाशी व्हेरीफाय नाही अशा ईपीएफ खात्यांना नियोक्ताचे ईपीएफ योगदान दिले जाणार नाही. तर आपण अद्याप हे कार्य केले नसेल तर ते त्वरित पूर्ण करा. (If your Aadhaar is not linked to the EPF account, then the money will not be credited to the account)

आधार लिंक न केल्यास होतील समस्या

ईपीएफओने ईपीएफ खातेधारकांना नवीन मार्गदर्शक तत्त्वाबद्दल माहिती दिली आहे की सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 च्या कलम 142 ची अंमलबजावणी झाल्यास, त्या सदस्यांसाठीच ईसीआर दाखल केला जाईल. ईपीएफओने आपल्या खातेदारांना या सूचनांचे अनुसरण करण्यास सांगितले आहे आणि आपल्या खात्यात आधार क्रमांक अपडेट करण्यास सांगितले आहे. जेणेकरून आपणास कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये.

हे काम करण्यास सक्षम राहणार नाही

जर एखाद्या ईपीएफ खाते खातेधारकाच्या आधार क्रमांकाशी लिंक केले नसेल तर त्या कर्मचार्‍यास केवळ एका महिन्याचे ईपीएफ योगदान मिळेल. त्याला महिन्याचे ईपीएफ योगदान दिसू शकणार नाही. याशिवाय ईपीएफ खातेदार उपलब्ध ईपीएफओ सेवा वापरण्यास सक्षम राहणार नाहीत.

आधारला ईपीएफशी कसे लिंक करायचे

– ईपीएफशी आधार क्रमांक जोडण्यासाठी तुम्हाला ईपीएफओ पोर्टल epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल. – ‘ई-केवायसी पोर्टल’ आणि ‘आधार लिंक टू यूएएन’ नंतर ‘ऑनलाईन सर्व्हिसेस’ पर क्लिक करा. – आपला यूएएन नंबर आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करा. – नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. – त्यानंतर ओटीपी आणि आपला 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा. – भरल्यानंतर ‘सबमिट’ या बटणावर क्लिक करा. – ‘ओटीपी व्हेरिफाय’ पर्यायावर क्लिक करा.

यानंतर आपल्या आधार तपशीलांची पडताळणी करण्यासाठी आपल्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या मेलच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी जनरेट करा. ईपीएफओ तुमच्या नियोक्ताांशी तुमच्या आधार-ईपीएफ लिंकच्या पडताळणीसाठी संपर्क करेल. एकदा रिक्रूटरने आपला आधार ईपीएफ खात्याशी जोडून पडताळणी केली की तुमचे ईपीएफ खाते तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केले जाईल. (If your Aadhaar is not linked to the EPF account, then the money will not be credited to the account)

इतर बातम्या

Modi Cabinet Reshuffle: संभाव्य चर्चेला पूर्णविराम, महाराष्ट्रातून 4 नेते मंत्रीपदी, राणे, कराड, पवार, पाटलांना संधी, 43 मंत्र्यांची अधिकृत यादी एका क्लिकवर

Modi cabinet Expansion: मोदींच्या बैठकीत राणेंना पहिल्या रांगेत पहिलं स्थान, खास फोटोची, खास गोष्ट

Follow Us
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी