AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC IPO : एलआयसी आयपीओचा अखेर मुहूर्त लागला, मे महिन्यातील ‘या’ तारखेला येणार IPO, केंद्र 7 टक्के भागीदारी विकणार?

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या आयपीओचा अखेर मुहूर्त लागलाय. एलआयसीचा 50 हजार कोटींचा आयपीओ मे महिन्यात केंद्र सरकार आणण्याच्या तयारीत आहे. अशी माहिती ब्ल्यूमबर्गने त्यांच्या एका रिपोर्टमध्ये दिली आहे.

LIC IPO : एलआयसी आयपीओचा अखेर मुहूर्त लागला, मे महिन्यातील 'या' तारखेला येणार IPO,  केंद्र 7 टक्के भागीदारी विकणार?
LIC IPOImage Credit source: tv9
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Apr 06, 2022 | 8:20 AM
Share

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या आयपीओचा (LIC IPO) अखेर मुहूर्त लागलाय. एलआयसीचा 50 हजार कोटींचा आयपीओ 12 मे 2022 पूर्वी येऊ शकतो. केंद्र सरकार (central govenment) एलआयसीची 7 टक्के भागीदारी विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती ब्ल्यूमबर्गने त्यांच्या एका रिपोर्टमध्ये दिली आहे. यापूर्वी केंद्र सरकार मार्चमध्ये एलआयसीचा आयपीओ आणण्याच्या तयारी होते. मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine war) शेअर बाजारात सुरू असलेल्या उलथापालथीनंतर सरकारने आयपीओ लाँच केला नाही. पण, सध्याची बाजारातील परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा LIC IPO आणण्याची तयारी सुरू केली आहे. एलआयसीसाठी केंद्रीय मंत्र्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांची बैठक लवकरच होण्याची शक्यता आहे. या बैठकीत LIC IPO साठी शेअरची किंमत ठरवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या बैठकीत शेअर बाजाराची स्थिती पाहता एलआयसीच्या आयपीओच्या वेळेबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो.

ब्ल्यूमबर्ग मार्केटचं ट्विट

7 टक्के भागीदारी विकणार?

केंद्र सरकार आता 5 टक्क्यांऐवजी आयपीओद्वारे एलआयसीमधील 7 टक्के हिस्सेदारी विकण्याची तयारी करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या वर्षी मार्चपर्यंत आयपीओ लाँच करण्याची त्यांची तयारी होती. पण, रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजारातील पडझडीच्या परिस्थितीमुळे केंद्र सरकारने आयपीओ लॉंच केला नाही. आता केंद्र 12 मे पूर्वी आणावे लागेल. कारण जुन्या मसुद्यानुसार त्याची अंतिम तारीख 12 मे आहे. जर या कालावधीनंतर सरकारने एलआयसीचा आयपीओ आणला तर त्याला नवीन मसुदा सादर करावा लागेल.

लवकरच बैठक होणार

केंद्र सरकारने पुन्हा LIC IPO आणण्याची तयारी सुरू केली आहे. एलआयसीसाठी केंद्रीय मंत्र्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांची बैठक लवकरच होण्याची शक्यता आहे. या बैठकीत LIC IPO साठी शेअरची किंमत ठरवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या बैठकीत शेअर बाजाराची स्थिती पाहता एलआयसीच्या आयपीओच्या वेळेबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो.

आरबीआयचे संकेत

आरबीआयने यापूर्वी म्हटलं होतं की योग्य वेळी एलआयसी आयपीओ लाँच करणं खूप महत्त्वाचं आहे. LIC IPO चे यश किरकोळ गुंतवणूकदारांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे.  RBI ने आपल्या मार्च बुलेटिनमध्ये म्हटलंय की, ‘LIC IPO ची योग्य वेळ खूप महत्वाची आहे. 35 टक्के IPO किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. LIC IPO साठी त्यांचा प्रतिसाद महत्वाचा आहे. मार्चच्या सुरुवातीला रशिया आणि युक्रेनमधील युद्ध जोरात सुरू होते. तेव्हा एलआयसी आयपीओसाठी नियुक्त केलेल्या गुंतवणूक बँकर्सनीही सरकारला एलआयसी आयपीओ आणण्यासाठी घाई करू नये’ असा सल्ला आरबीआयने दिला होता.

इतर बातम्या

पेट्रोल, डिझेल दर वाढीसोबतच पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या भावात वाढ

Pune Crime | ‘आमच्या गॅंगसोबत का राहत नाहीस?’ पुण्यात तरुणाला मारहाण करणारा गुंड जेरबंद

Sonalee Kulkarni: फिल्मफेअरमध्ये सोनालीचा जबरदस्त परफॉर्मन्स; मादक अदांनी चाहत्यांना केलं घायाळ

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…