AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहो आश्चर्यम! पेट्रोल, डिझेलच्या किंमती सलग आठव्या दिवशी स्थिर

Petrol and Diesel | सप्टेंबर महिन्याचा पंधरवडा उलटत आला तरी इंधनाच्या दरात फारशी कपात झालेली नाही. रविवारी देशात सलग सातव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. यापूर्वी 5 सप्टेंबरला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट झाली होती.

अहो आश्चर्यम! पेट्रोल, डिझेलच्या किंमती सलग आठव्या दिवशी स्थिर
पेट्रोल-डिझेल
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Sep 13, 2021 | 7:00 AM
Share

मुंबई: देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा फ्रीझ मोडमध्ये जाताना दिसत आहेत. कारण, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सलग आठव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.26 रुपये तर एका लीटल डिझेलसाठी 96.19 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 आणि 88.62 रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.

सप्टेंबर महिन्यातील 13 दिवसांत पेट्रोलच्या किंमतीत अवघ्या 30 पैशांची घट

सप्टेंबर महिन्याचा पंधरवडा उलटत आला तरी इंधनाच्या दरात फारशी कपात झालेली नाही. रविवारी देशात सलग सातव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. यापूर्वी 5 सप्टेंबरला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट झाली होती. सप्टेंबर महिन्यातील पहिल्या 12 दिवसांमध्ये इंधनाच्या दरात अवघ्या 30 पैशांची कपात झाली आहे. त्यामुळे इंधनाचे दर कमी होऊन महागाई आटोक्यात येण्याच्या सामान्यांच्या आशा पार धुळीस मिळाल्या आहेत.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

इंधनाचे दर वाढल्याने मोदी सरकारची चांदी

देशभरात इंधन दरवाढीमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. मात्र, हा काळ केंद्र सरकारसाठी सुगीचा ठरताना दिसत आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलवरील करांच्या माध्यमातून केंद्र सरकारला मिळणाऱ्या महसूलात घसघशीत वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांमध्येच इंधनावरील अबकारी करातून (Excise Duty) मिळणाऱ्या महसूलात तब्बल 48 टक्के वाढ झाली आहे.

केंद्र सरकारला तेल रोख्यांचे पैसे अदा करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर खर्च करावा लागत आहे. मात्र, यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांत कराच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न या देयकांच्या तीनपट इतके आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार, एप्रिल ते जुलै या काळात अबकारी कराच्या माध्यमातून सरकारला एक लाख कोटीहून अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षी हाच आकडा 67,895 कोटी रुपये इतका होता.

संबंधित बातम्या:

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव पुन्हा कडाडले, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

पेट्रोल-डिझेल चढ्या दरात विकून इंडियन ऑईलने किती नफा कमावला?

Fuel Price Hike: केंद्र सरकारने वर्षभरात पेट्रोल-डिझेलवरील कर वाढवला नाही, मग 32 रुपयांची दरवाढ कशी झाली?

(Petrol and Diesel rates in country Today)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...