AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price: पेट्रोलनंतर आता ‘या’ शहरात डिझेलचीही सेंच्युरी , सामान्य नागरिकांच्या चिंतेत भर

Petrol Diesel | पेट्रोलनंतर डिझेलचे दर 100 रुपये प्रति लीटरच्या पुढे गेले आहे. राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये किंमती जयपूरच्या तुलनेत खूप जास्त आहेत आणि याचा परिणाम डिलर्सवर होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Petrol Diesel Price: पेट्रोलनंतर आता 'या' शहरात डिझेलचीही सेंच्युरी , सामान्य नागरिकांच्या चिंतेत भर
पेट्रोल
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 04, 2021 | 3:18 PM
Share

नवी दिल्ली: आता देशात पेट्रोलनंतर डिझेलचे भाव 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सोमवारी पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 109.40 आणि 100.10 रुपये इतकी नोंदवण्यात आली. राजस्थान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन (आरपीडीए) च्या आकडेवारीनुसार, जयपूर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलने शंभरी ओलांडली आहे.

‘आरपीडीए’चे अध्यक्ष सुनीत बगाई म्हणाले की, तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोलनंतर डिझेलचे दर 100 रुपये प्रति लीटरच्या पुढे गेले आहे. राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये किंमती जयपूरच्या तुलनेत खूप जास्त आहेत आणि याचा परिणाम डिलर्सवर होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्ली आणि मुंबईत पेट्रोल शंभरीपार

भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी इंधनाच्या दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. यापूर्वी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 25 आणि 30 पैशांची वाढ करण्यात आली होती. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा हा वेग पाहता सामान्यांना पुन्हा एकदा धडकी भरली होती. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल 1.05 रुपयांनी महागले आहे. तर डिझेलची किंमत 2.09 रुपयांनी वाढली आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 108.44 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 98.45 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 102.39 आणि 90.77 रुपये इतका आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे सर्व रेकॉर्डस मोडीत निघणार?

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने खनिज तेलाचे दर वाढत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढीचा कल आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 80 च्या जवळ पोहोचली आहेयेत्या एक ते दोन आठवड्यांत देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते. अनेक शहरांमध्ये ते 110 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचा दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्या आणखी किती काळ नुकसान सोसून इंधनाचे दर स्थिर ठेवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, लवकरच सामान्य नागरिकांना याचा फटका बसू शकतो. दसऱ्यापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवे उच्चांक प्रस्थापित करतील, असा जाणकारांचा होरा आहे. प्रत्यक्षात असे घडल्यास सामान्य नागरिकांना त्याची प्रचंड झळ सोसावी लागेल.

इतर बातम्या:

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?

दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका

खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?

…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?

Follow Us
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना...
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा!
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी...
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी सजलेला गाभारा पाहून भाविक मंत्रमुग्ध
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर येताच खळबळ