100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 4 November 2021
गुजरातच्या सीमेवरील प्रदेशात मोदींचे नाव न घेता शिवसेना जिंकली, देगलुरला ‘मोदी मोदी’ करूनही भाजपला माती खावी लागली. महाराष्ट्राच्या विजयाचे दमदार पाऊल देशपातळीवर पडले आहे. या पावलाखाली सर्व अमंगल, अन्याय चिरडून जाईल. महाराष्ट्र व जनतेची भरभराट होईल, अशा शुभेच्छा आजच्या अग्रलेखातून देण्यात आलेल्या आहेत.
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांना आस्मान दाखवलं. तर शिवसेनेने दिवाळीला सीमोल्लंघन करत दादरा नगर हवेलीत भगवा फडकविला. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोलेबाजी करत भाजपला चिमटे काढले आहेत. गुजरातच्या सीमेवरील प्रदेशात मोदींचे नाव न घेता शिवसेना जिंकली, देगलुरला ‘मोदी मोदी’ करूनही भाजपला माती खावी लागली. महाराष्ट्राच्या विजयाचे दमदार पाऊल देशपातळीवर पडले आहे. या पावलाखाली सर्व अमंगल, अन्याय चिरडून जाईल. महाराष्ट्र व जनतेची भरभराट होईल, अशा शुभेच्छा आजच्या अग्रलेखातून देण्यात आलेल्या आहेत.
तेरा राज्यांतील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीतील निकाल त्यांनी दिवाळी साजरी करून नाचावे, असे लागलेले नाहीत. गुजरातच्या सीमेवरील प्रदेशात मोदींचे नाव न घेता, पोस्टरवर त्यांचे चित्र न लावता शिवसेना जिंकली व देगलुरला ‘मोदी मोदी’ करूनही भाजपला माती खावी लागली. दिवाळीचे फटाके फुटू लागले आहेत, असं राऊतांनी म्हटलं आहे.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया

