Ravindra Waikar यांच्या अडचणीत वाढ, पत्नीसह इतरांवरही गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
VIDEO | ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या अडचणीत मोठी वाढ, रविंद्र वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नी मनीषा वायकर आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण? बघा व्हिडीओ
मुंबई, १५ सप्टेंबर २०२३ | ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर चांगलेच अडचणी आले आहेत. रविंद्र वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नी मनीषा वायकर आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आमदार रविंद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीसह इतरांवर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जोगेश्वरीतीली भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले असून वायकर यांचा जबाबही नोंदवण्यात आला होता. दरम्यान हायकोर्टात ते गेल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर आता थेट आर्थिक गुन्हे विभागाने त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रविंद्र वायकर यांचा घोटाळा उघड केला होता. यासंदर्भात सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!

