Gunaratna Sadavarte : ‘सुरेश धसांना दोन पत्नी…’, गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
आमदार सुरेश धस यांना 1946 च्या कायद्यानुसार दोन पत्नी असल्याचा बडेजाव करण्याची मुभा नाही, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केलाय.
भाजप आमदार सुरेश धस यांनी शनिवारी धारशिवमधील मोर्चात ‘तुझ्या…दम आहे का? आमच्यात दम आहे. एक नाही दोन सांभाळतोय, दोन्हींना तीन लेकरे आहेत.’, असं वक्तव्य केले होते. यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केलाय. आमदार सुरेश धस यांना 1946 च्या कायद्यानुसार दोन पत्नी असल्याचा बडेजाव करण्याची मुभा नाही. हे शील आचारसंहिताला खीळ घातल्यासारखे आहे. सुरेश धस यांनी प्रभू रामचंद्रची एक वचनी एक पत्नी हे वाक्य सुद्धा धुळीस मिळवले आहे, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. पुढे सदावर्ते असेही म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासकीय अधिकारी यांना दोन बायकांचा अधिकार नाही याला कुठे तरी प्रतिबंध घातला पाहिजे. याबाबत मुख्यमंत्री, पंतप्रधान, भाजप अध्यक्ष यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करून आमदार धस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. तर 1946 चा कायदा हा बायकांच्या बाबतीत आहे. अपत्यांच्या बाबतीत नाही. कारण मंत्री धनंजय मुंडे यांनी अपत्या विषयी भारत निवडणूक आयोगकडे शपथपत्र दिले. त्यात पाच अपत्य असल्याचे नमूद केले आहे. मुंडे यांनी प्रतिज्ञा पत्रात दाखवलेली अपत्य सत्यच असणार ना… अपत्यावरुन अपात्र करण्याचा कायदा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत दिसत नसल्याचेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
Published on: Jan 12, 2025 05:40 PM
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
