औरंगजेब स्टेटसचं भूत उतरता उतरेना, आता वादग्रस्त विधानामुळं शहर बंदची हाक; कुठं झालेत युवक आक्रमक
येथे यावरून अनेक तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याचदरम्यान आता येथील पारनेरमध्ये पाबळ येथे एका तरुणाने औरंगजेबाचे स्टेटस ठेवलेच त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यावरून ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
पारनेर : अहमदनगर जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून शेवगाव, जवखेडे, मिरजगाव या ठिकाणी औरंगजेबच्या फोटो आणि स्टेटसवरून वाद होत आहेत. येथे यावरून अनेक तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याचदरम्यान आता येथील पारनेरमध्ये पाबळ येथे एका तरुणाने औरंगजेबाचे स्टेटस ठेवलेच त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यावरून ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. तर हिंदुत्ववादी संघटनांकडून पारनेर बंदची हाक देण्यात आली आहे. यादरम्यान संबंधित युवकाविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. रात्री उशिरा या युवकाला घेतलं ताब्यात. पारनेर पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलय. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता शांतता राखावी असे आवाहन पारनेर तालुक्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे.
Published on: Jun 12, 2023 02:04 PM
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
