तीन मंत्र्यांसोबत आज बैठक, त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार; अजित नवले यांचं वक्तव्य
Dr. Ajit Nawale on Farmers Long March : विविध मागण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेत. किसान सभेचे नेते डॉ.अजित नवलेही या मार्चमध्ये सहभागी झाले आहेत. नवले म्हणाले...
धांदरफळ, अहमदनगर : विविध मागण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेत. अहमदनगरहून शेतकऱ्यांचा लॉंगमार्च निघाला. किसान सभेचे नेते डॉ.अजित नवलेही या मार्चमध्ये सहभागी झाले आहेत. अजित नवले यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. “किसान लॉंगमार्चचा आजचा दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या या मार्चची दखल घेतली आहे. आज महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील , कामगार मंत्री सुरेश खाडे तसेच आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्यासोबत आज बैठक पार पडणार आहे. संगमनेरच्या किसान सभेचे पदाधिकारी आणि मंत्री महोदयांसोबत ही बैठक होणार आहे. आज बैठकीत सकारात्मक तोडगा निघावा, अशी अपेक्षा आहे, असं अजित नवले म्हणालेत. मोर्चेकरी तुर्त धांदरफळ इथल्या रामेश्वर मंदिरात मुक्कामी आहेत. बैठकीत काय होतं यावर आंदोलनाची पुढची दिशा ठरेल, असंही अजित नवले म्हणालेत.
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....

