गोष्टी हाताबाहेर गेल्या की गुलाबराव अशी वक्तव्य करतात; रोहित पवार यांची जोरदार टीका
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बंडखोरीबाबत खुलासा केला. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केलीय. पाहा...
मुंबई : “एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर गेला. त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली”, असं पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केलीय. “ज्यावेळी अनेक गोष्टी हाताबाहेर जातात, त्यावेळी अशी वक्तव्ये केली जातात. एकनाथ शिंदे फक्त मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहे का? या गोष्टी अयोग्य आहेत. सर्व समाजासाठी एकत्रित धोरण ठरविणं गरजेचं आहे. इतर समाजाचे देखील प्रलंबित प्रश्न आहे”, असं म्हणत रोहित पवार यांनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला आहे.
Published on: Feb 25, 2023 04:10 PM
Follow Us
Latest Videos
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
