अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकींवर गोळीबार, प्रकृती गंभीर; लिलावतीत उपचार सुरु
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाबा सिद्दीकी यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती मिळतेय.
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून सध्या बाबा सिद्दीकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वांद्रे पूर्व परिसरात ही गोळीबाराची घटना घडली. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. वांद्रे पूर्व येथील बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ गोळीबार झाला. रात्री 9.15 च्या सुमारास ही घटना घडली. निर्मल नगर भागात फटाके वाजत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळतेय. सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर झाले. यातील एक गोळी बाबा सिद्दीकी यांच्या थेट छातीला लागली. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळच हा गोळीबाराचा प्रकार घडला. या घटनेनंतर बाबा सिद्दीकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिकचा तपास करत आहे.
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
