Baba Siddique Shot Dead : …म्हणून बाबा सिद्दीकी यांची हत्या केली, बिश्नोई गँगचा पोस्टमधून मोठा खुलासा उघड
बाबा सिद्दिकी यांची काल रात्री तीन जणांनी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. झिशान सिद्दिकी यांच्या वांद्र्यातील कार्यालयासमोर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकऱणातील मोठी अपडेट समोर आली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवर काल गोळीबार करण्यात आला. यामध्ये त्यांची हत्या झाली. या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतल्याची माहिती समोर येत आहे. बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर करण्यात आली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. ‘जो दाऊदला मदत करणार, त्याचा हिशोब आम्ही करणार’, असा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. हिंदी भाषेत ही पोस्ट लिहिली असून यामध्ये सलमान खानचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. तर बाबा सिद्दीकींच्या हत्येचे कारण दाऊदला बॉलिवूड, राजकारण आणि प्रॉपर्टी डिलींगशी जोडणे असे होते. आम्ही कोणासोबतही दुश्मनी नाही. पण जो कोणी सलमान खान आणि दाऊदच्या गँगची मदत करेल, त्याचा आम्ही हिशोब नक्की करु. असा इशाराही यातून देण्यात आला आहे. बघा बिश्नोई गँगच्या सदस्याने केलेल्या पोस्टमध्ये नेमकं काय?
Published on: Oct 13, 2024 01:19 PM
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
