अब्दुल सत्तार गंदी नालीचा XX; ठाकरे गटाच्या आमदाराची जीभ घसरली
Nitin Deshmukh on Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करताना बाळापूरचे शिवसेना ठाकरेगटाचे आमदार नितीन देशमुख यांची जीभ घसरली आहे. ते काय म्हणालेत? पाहा...
अकोला : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करताना अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना ठाकरेगटाचे आमदार नितीन देशमुख यांची जीभ घसरली आहे. अब्दुल सत्तार हा गंदी नालीचा XX आहे, असं नितीन देशमुख म्हणाले आहेत. अब्दुल सत्तार यांनी मला सल्ला देण्याची गरज नाही. पारसची घटना घडली तेव्हा मी तिथंच होतो. गारपीट झाली तिथं मी गेलो होतो. सत्तार यांना सल्ला द्यायचाच असेल तर आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावा. कारण जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. पारसची दुर्घटना घडली तेव्हा त्यांचं कर्तव्य होतं. अमरावतीला आले पण फडणवीस इथं आले नाहीत, असंही नितीन देशमुख म्हणालेत.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला

