Ajit pawar news: “शरद पवार आमचे भीष्मपितामह, आमचा पक्ष फुटला नाही”, अमोल मिटकरी यांचं सूचक विधान
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. अजित पवार हे 30 आमदारांसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समील झाले आहेत. या आमदारांमध्ये अमोल मिटकरी यांचाही समावेश आहे. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी देखील मंत्रपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान गुरुपौर्णिमेनिमित्त अमोल मिटकरी यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली
मुंबई: शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. अजित पवार हे 30 आमदारांसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समील झाले आहेत. या आमदारांमध्ये अमोल मिटकरी यांचाही समावेश आहे. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी देखील मंत्रपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान गुरुपौर्णिमेनिमित्त अमोल मिटकरी यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की,”शरद पवार आमच्यासाठी भीष्मपितामह आहेत. पक्ष हा अजित पवार यांच्यासोबत आहे.आमचा पक्ष फुटला नाही. अपात्रतेचा काय निर्णय येईल ते माहित नाही. राहुल नार्वेकर काय निर्णय घेतील ते सांगू शकणार नाही. त्यामुळे त्यावर मी काही बोलणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे महाराष्ट्राचे नेतृत्व अजित पवार यांनी करावे.अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष आहे.” तसेच संजय राऊत यांनी अजित पवार यांची डील मुख्यमंत्रीपदासाठीच झाल्याचं म्हटलं आहे. यावर “अजित पवार मुख्यमंत्री होणार आहेत असं जर संजय राऊत म्हणत असतील, तर संजय राऊत यांच्या तोंडात बारामतीची साखर,” असंही अमोल मिटकरी म्हणाले.
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती

