AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aryan Khan | आर्यन खानसह इतर आरोपींना घेऊन किल्ला कोर्टसाठी रवाना

Aryan Khan | आर्यन खानसह इतर आरोपींना घेऊन किल्ला कोर्टसाठी रवाना

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 04, 2021 | 4:35 PM
Share

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने चौकशी दरम्यान कोठडीत कबूल केले आहे की तो गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत होता. त्याने केवळ भारतातच नाही तर दुबई, यूके आणि इतर अनेक देशांतही अंमली पदार्थांचे सेवन केले आहे.

अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (NCB) अटक करण्यात आली आहे. आर्यन खान सध्या पोलीस कोठडीत असून एनसीबीच्या सूत्रांनुसार ते आर्यन खान, अरबाज मर्चेट आणि मुनमुन धामेचा यांच्या एनसीबी कोठडीची आज पुन्हा मागणी करतील.

एनसीबीच्या सूत्रांनुसार, जर आर्यनला या कार्यक्रमात अतिथी म्हणून आमंत्रित केले गेले असेल, तर त्याला यासाठी काही आमंत्रण किंवा काही प्रकारचा प्रस्ताव असायला हवा होता. परंतु त्याच्याकडे असे कोणतेही आमंत्रण किंवा प्रस्ताव नाही. तो फक्त असे म्हणत आहे की त्याला आमंत्रित केले गेले होते, मग ते कोणी केले, तो योग्य प्रकारे सांगू शकला नाही आणि अरबाजला प्रत्येक गोष्टीची माहिती होती असे म्हणत तो टाळत आहे.

बोर्डिंग पास शिवाय आर्यनला एंट्री देणारा कोण होता, कोणी त्याला आमंत्रित केले होते, हे एनसीबी तपासत आहे. हेच कारण होते की एनसीबीने प्राथमिक चौकशीच्या आधारावर त्याची 2 दिवसाची कस्टडी मागितली.

Follow Us
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..