किरिट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर जिल्हा बँकेच्या लेखापरीक्षणाचे आदेश
भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी जिल्हा बँकेविरोधात केलेल्या तक्रार दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात येत आहे.
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर आता मुश्रीफ यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना व गडहिंग्लज साखर कारखाना, ब्रिक्स कंपनीला दिलेल्या कर्जपुरवठ्यावरून जिल्हा बँकेचे चाचणी लेखापरीक्षण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत सहनिबंधक अरुण काकडे यांनी जिल्हा बँकेचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी जिल्हा बँकेविरोधात केलेल्या तक्रार दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात येत आहे. या चौकशीसाठी विभागीय सहनिबंधक डी. टी. छत्रीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Published on: Mar 09, 2023 11:58 AM
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
