AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thama Movie : आयुष्यमान खुराना अन् रश्मिका मंदाना साई दरबारी... साईबाबांना काय घातलं साकडं?

Thama Movie : आयुष्यमान खुराना अन् रश्मिका मंदाना साई दरबारी… साईबाबांना काय घातलं साकडं?

| Updated on: Oct 14, 2025 | 1:24 PM
Share

21 ऑक्टोबर रोजी दिपावलीच्या मुहूर्तावर "थामा" हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असुन चित्रपटाच्या यशासाठी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता आयुष्यमान खुराना यांनी साईबाबांना साकडं घातलय.. 

रोमँटीक , कॉमेडी आणि हॉरर असा तिहेरी मिलाफ असलेला “थामा” चित्रपट प्रदर्शित होत असल्याने सिनेरसिकांमध्ये चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. 21 ऑक्टोबर रोजी दिपावलीच्या मुहूर्तावर “थामा” हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. रश्मिका मंदाना आणि आयुष्यमान खुराना यांनी साईसमाधी नंतर द्वारकामाईतही मनोभावे दर्शन घेतले. रश्मिकामुळे मला पहिल्यांदाच साई दरबारी येण्याचा योग आला आणि साईबाबांच्या दर्शनाने आत्मिक समाधान होत असल्याच अभिनेता आयुष्यमान खुराना याने म्हटलंय…तर साईबाबांचा आशिर्वाद नेहमीच आमच्या सोबत आहे , साईदर्शन घेतल्यानंतर आत्मिक समाधान मिळत असल्याची भावना रश्मिका मंदाना हिने व्यक्त केली.

 

Published on: Oct 14, 2025 01:24 PM