AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Azad Maidan ST Strike | जे कामावर येऊ इच्छितात, त्यांना संरक्षण देणार- अनिल परब

Azad Maidan ST Strike | जे कामावर येऊ इच्छितात, त्यांना संरक्षण देणार- अनिल परब

| Edited By: sagar joshi | Updated on: Nov 11, 2021 | 6:42 PM
Share

भाजप कार्यकर्ते एसटी कर्मचाऱ्यांना अडवण्याचं काम करत आहेत. कामगारांनो तोल जाऊ देऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आंदोलनात वेळ वाया घालवू नका. जो अहवाल येईल त्याचं बंधन आम्हा दोघांवरही असेल. राजकीय आंदोलन करुन एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही, असा टोलाही अनिल परब यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबतच रात्र काढली. एसटीच्या विलिनीकरणाचा निर्णय झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. बऱ्याच एसटी कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे. मात्र, भाजपचे कार्यकर्ते यांना अडवत असल्याचा आरोप परब यांनी केलाय.

बऱ्याच एसटी कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे. त्यांना संरक्षण देण्याचा निर्णयही आम्ही घेतलाय. इतर कामगारांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करु नये. याबाबत पोलिस आणि एसटीच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा झाल्याचं परब यांनी सांगितलं. तसंच भाजप कार्यकर्ते एसटी कर्मचाऱ्यांना अडवण्याचं काम करत आहेत. कामगारांनो तोल जाऊ देऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आंदोलनात वेळ वाया घालवू नका. जो अहवाल येईल त्याचं बंधन आम्हा दोघांवरही असेल. राजकीय आंदोलन करुन एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही, असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या