बीडमध्ये चालंलय काय? शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का; ‘त्या’ पोस्टने खळबळ
धनंजय नागरगोजे गेली 18 वर्षापासून केज तालुक्यातील केळगाव येथील गजराम मुंडे निवासी आश्रम शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. धनंजय नागरगोजे यांनी संस्थाचालकाच्या बीड येथील पतसंस्थेसमोर आत्महत्या केली
बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बीडमधील एका आश्रमशाळेतील शिक्षकाने फेसबूक पोस्ट लिहून आत्महत्या केली आहे. गेल्या १८ वर्षांपासून वेतन न मिळाल्याने आश्रमशाळेतील शिक्षकाने आपलं जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव धनंजय नागरगोजे असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आश्रमशाळेत वेतन मागितल्यावर गळफास घे, असं उत्तर दिल्याचा उल्लेख धनंजय नागरगोजे यांच्या फेसबूक पोस्टमध्ये करण्यात आला आहे. तर आश्रमशाळेचे संस्थाचालक विक्रम मुंडे असल्याचा उल्लेखही धनंजय नागरगोजे यांच्या फेसबूक पोस्टमध्ये पाहायला मिळतोय. तर बीड जिल्ह्यातील केळगाव येथील आश्रम शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या सहकारी शिक्षकांनी दिली आहे. धनंजय नागरगोजे यांनी कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच मध्यरात्री गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांकडून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी

संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल

दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
