स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, सांगली पोलीस डमी बनून गेले अन्…, नेमकं प्रकरण काय?
VIDEO | सांगली पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, सांगलीत कल्याणकर प्लाझाच्या फ्लॅटमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय
सांगली, ९ ऑगस्ट २०२३ | सांगली बस स्थानकाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एका इमारतीत स्पा सेंटरच्या नावाने अक्षरश: देहविक्रीचा व्यवसाय सुरु होता. पोलिसांनी या स्पा सेंटरचा पर्दाफाश केला आहे. सांगली पोलिसांनी काल, मंगळवार सर्वात मोठी कारवाई केली आहे. सांगलीत स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरु होता. या स्पा सेंटरचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. स्पा सेंटर चालवणारा आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु करण्यात आला आहे. सांगली शहरातील बस स्टॅन्डजवळ असणाऱ्या इमारतीत डिलक्स स्पा नावाच्या स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु होता. सांगली शहर पोलिसांना या स्पा सेंटरची खबर लागताच त्यांनी संबंधित स्पा सेंटर उद्ध्वस्त केला आहे. सांगली शहर पोलिसांनी डिलक्स स्पा सेंटरमध्ये छापा टाकल्यानंतर पाच महिलांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर चौकशी करुन त्यांची सुटका करण्यात आली आहे
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

