तर मनसे स्टाईलनं धडा शिकवू ! महावितरण कार्यालयावर धडक देत कुणाचा इशारा?

VIDEO | महावितरणच्या सिक्युरिटी डिपॉझिटला मनसेचा विरोध, महावितरण कार्यालयावर धडक देत कुणी दिला इशारा

तर मनसे स्टाईलनं धडा शिकवू ! महावितरण कार्यालयावर धडक देत कुणाचा इशारा?
| Updated on: Apr 25, 2023 | 3:14 PM

ठाणे : उल्हासनगरमध्ये मनसेनं महावितरण कार्यालयावर धडक दिली. महावितरणकडून अतिरिक्त सिक्युरिटी डिपॉझिटची बिलं ग्राहकांना पाठवण्यात आली असून त्याची जोरजबरदस्तीने वसुली करत ग्राहकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप मनसेनं केलाय. वीज ग्राहकांना महावितरणने अव्वाच्या सव्वा अतिरिक्त सिक्युरिटी डिपॉझिटची बिलं पाठवली आहेत. हे डिपॉझिट वसूल करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी ग्राहकांशी उद्धटपणे वागत ग्राहकांना त्रास देत असल्याचा मनसेचा आरोप आहे. याविरोधात मनसेनं उल्हासनगरच्या महावितरण कार्यालयात धडक दिली. यावेळी सिक्युरिटी डिपॉझिट न घेण्याची मागणी मनसेनं केली, सोबतच जर महावितरण कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीत बदल झाला नाही, तर मनसे स्टाईलने धडा शिकवण्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिला. यावेळी उल्हासनगर शहरातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मनसेच्या इशाऱ्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट भरणं कंपल्सरी नसल्याचं महावितरणकडून स्पष्ट करण्यात आलं.

Follow us
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.