VIDEO | ‘फडणवीस याचे सत्य वाक्य तुम्हाला अन तुमच्या घरबश्याला झोबलं…’; भाजप नेत्याचा सामनाच्या टीकेला पलटवार
दैनिक सामनातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. फडणवीस यांच्यावर टीका करताना, ते आधी संवेदनशील होते. मात्र आता ‘उप’ झाल्याने ते वैफल्यात आहेत. तर ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ झाल्याची टीका देखील सामन्यातून करण्यात आली आहे.
मुंबई : 19 ऑगस्ट 2023 | ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या जळजळीत टीकेत ते अहंकाराचे महामेरू बनले असून ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याने त्यांच्यात न्यूनगंडाने आला आहे. तर त्यामुळेच ते अस्वस्थ असल्याची टीका करण्यात आली आहे. याच टीकेला आता भाजपकडून पलटवार करण्यात आला आहे. भाजपचे नेते आमदार राम कदम यांनी या टीकेला प्रत्युत्तर देताना, फडणवीस यांच्यावर टीका करनं हे तुमची उरली सुरली अस्तित्व टिकवण्यासाठी राजकीय आवश्यकता असल्याचे महाराष्ट्र जाणतो असे म्हटलं आहे. तर फेसबुक सरकार आणी फेस टू फेस सरकार… हे देवेंद्रजीच सत्य वाक्य तुम्हाला अन तुमच्या घरबश्याला झोबलं.. आहे. तर बंद दाराआड … हा फडणवीस यांचा शब्द तर भर नशेत तुमची जिरवणारा होता असा टोला लगावला आहे.
Published on: Aug 19, 2023 11:40 AM
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
