AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुरेश धसांचा पुन्हा भास्कर केंद्रेंवर आरोप, करूणा शर्मांची गाडी, 'ते' दोन पोलीस कोण?

सुरेश धसांचा पुन्हा भास्कर केंद्रेंवर आरोप, करूणा शर्मांची गाडी, ‘ते’ दोन पोलीस कोण?

| Updated on: Feb 04, 2025 | 10:45 AM
Share

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. करूणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तुल ठेवण्याच्या कटात तसेच खोट्या नोटांच्या प्रकरणात देखील भास्कर केंद्रेंचा हात असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला.

भााजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा आक्रमक होत परळीचे हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे आणि पोलीस जमादार सचिन सानप यांच्यावर गंभीर आरोप केलेत. करुणा शर्माच्या गाडीत पिस्तुल ठेवण्याच्या कटात भास्कर केंद्रे आणि सचिन सांनप यांचा सहभाग होता असा आरोप सुरेश धस यांनी केला. दरम्यान सुरेश धसांनी केलेल्या आरोपानंतर सचिन सानप यांनी सर्व आरोप फेटाळलेत. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच्या केलेल्या संवादातून त्यांनी हे आरोप फेटाळलेत. ज्या करुणा शर्माच्या गाडीत पिस्तुल ठेवण्यावरून सुरेश धस यांनी केंद्रे आणि सानप यांच्यावर आरोप केले ते प्रकरण नेमक काय आहे? धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातल्या वादानंतर करुणा शर्मांनी पाच सप्टेंबर 2021 मध्ये परळीचा दौरा केला होता. दरम्यान परळीत वैजनाथाच्या दर्शनाला जाताना करुणा शर्माच्या गाडीला महिलांनी घेराव घातला होता. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. परळीत यावेळी करुणा शर्मा आणि काही महिलांमध्ये बाचाबाची देखील झाली होती. दरम्यान या बाचाबाची वेळी करुणा शर्माच्या गाडीत याच वेळी एका साडी घातलेल्या पुरुषानं रिव्हॉल्व्हर ठेवली. त्यानंतर करुणा शर्मा यांच्यावर पोलिसांनी अवैधरीत्या पिस्तुल वापरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. महिलांशी झालेल्या वादा प्रकरणी त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी करुणा मुंडे यांना अटकही करण्यात आली होती. दरम्यान सुरेश धस यांनी पुन्हा एकदा भास्कर केंद्रेंवर गंभीर आरोप केलेत. भास्कर केंद्रे परळीतील मटका किंग त्यांच्याकडे 15 जेसीबी, टिप्पर तसेच खोट्या नोटांच्या प्रकरणातही भास्कर केंद्रेंचा हात असल्याचा आरोप धस यांनी केला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Feb 04, 2025 10:45 AM