AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramdas Tadas Exclusive | भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनेला मारहाण ? काय आहे नेमकं प्रकरण ?

Ramdas Tadas Exclusive | भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनेला मारहाण ? काय आहे नेमकं प्रकरण ?

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Sep 08, 2021 | 3:47 PM
Share

वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस (BJP MP Ramdas Tadas) यांच्या सुनेने गंभीर आरोप केला आहे. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर त्यांना मारहाण होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस (BJP MP Ramdas Tadas) यांच्या सुनेने गंभीर आरोप केला आहे. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर त्यांना मारहाण होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे तडस यांच्या सुनेने मदतीची मागणी केली आहे. तसा व्हिडीओच चाकणकरांनी ट्विट केला आहे. दरम्यान, रामदास तडस यांनी मारहाणीचे आरोप फेटाळताना मुलगा आणि सुनेची भांडणं आहेत, यात माझी काही संबंध नाही, उलट मी मध्यस्थाची भूमिका बजावल्याचं टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

माझा मुलगा आणि सूनबाई लग्नानंतर कुटुंबापासून वेगळे राहत असल्याचं सांगत या सगळ्या प्रकरणात माझी काहीच भूमिका नाही. ही वैयक्तिक नवरा बायकोची भांडणं आहेत. यात राजकारण कुठून आलं, मला माहिती नाही. मी दोघांच्या भांडणात मध्यस्थाची भूमिका निभावली. मी पूजाला आताही सून मानतो, पुढेही मानेन, दोघांनीही माझ्याकडे राहायला यावं, असं तडस म्हणाले.

Follow Us