AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'शरद पवार यांचं राजीनामानाट्य म्हणजे घरगुती तमाशा', भाजपच्या बड्या नेत्याचा घणाघात

‘शरद पवार यांचं राजीनामानाट्य म्हणजे घरगुती तमाशा’, भाजपच्या बड्या नेत्याचा घणाघात

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: May 08, 2023 | 2:08 PM
Share

VIDEO | 'शरद पवार दुसऱ्याला कसं पक्षाचा अध्यक्ष होऊ देतील', भाजप नेत्याचा खोचक टोला

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि एकच खळबळ उडाली. यानंतर कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेण्यासाठी आग्रह केला तर काही ठिकाणी आंदोलनही झाले. या सर्वांच्या आग्रहाखातर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला. दरम्यान, यावरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तर पक्ष टिकवण्यासाठी ही सगळी नौटंकी सुरू अशल्याचे म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडलं. पुढे ते असेही म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही तीन दिवस सुरू होतं ती सगळी स्क्रिप्ट होती. तर राज्यात अशा अनेक शिक्षण आणि सहकारी संस्था आहेत ज्यांच्या घटना बदलून शरद पवार अध्यक्ष झालेत. त्यामुळे मला माहितच होतं की, शरद पवार दुसऱ्याला कसं पक्षाचा अध्यक्ष होऊ देतील. राष्ट्रवादीचा तीन दिवसांचा खेळ आणि नौटंकी म्हणजे हा घरगुती तमाशा होता, असे म्हणत बावनकुळे यांनी जोरदार घणाघात केला.

Published on: May 08, 2023 02:04 PM
Follow Us