AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Red Fort, Mumbai महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार - Chandrakant Patil

Red Fort, Mumbai महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार – Chandrakant Patil

| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 10, 2022 | 7:44 PM
Share

उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) विजय मिळाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी मुंबईत प्रदेश कार्यालयात प्रचंड जल्लोष केला. 

उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) विजय मिळाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी मुंबईत प्रदेश कार्यालयात प्रचंड जल्लोष केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपाला यश मिळाले आहे असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनही भाजपला विजयी करायचे असून मुंबई महानगरपालिकेवर (Mumbai Municipal Corporation) भाजपचा भगवा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल भाजपाचे गोवा निवडणूक प्रभारी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चंद्रकांत पाटील यांनी विशेष अभिनंदन केले. निवडणूक प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला बिहार विधानसभा निवडणुकीतही यश मिळाले आहे.

Published on: Mar 10, 2022 06:45 PM

Follow Us