Kishori Pednekar | ओमिक्रॉन येऊ नये यासाठी प्रयत्नशील : किशोरी पेडणेकर
टांझानियातून आलेल्या एका व्यक्तीचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याचा ओमिक्रॉनचा अहवाल अद्याप यायचा असून या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यांची ही तपासणी केली जात आहे. तसेच हाय रिस्क कंट्रीतून आलेल्या नागरिकांची बॅक हिस्ट्रीही तपासली जात असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
टांझानियातून आलेल्या एका व्यक्तीचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याचा ओमिक्रॉनचा अहवाल अद्याप यायचा असून या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यांची ही तपासणी केली जात आहे. तसेच हाय रिस्क कंट्रीतून आलेल्या नागरिकांची बॅक हिस्ट्रीही तपासली जात असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. महापौर किशोरी पेडणेकर यांनी मीडियाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. टांझानिया येथून आलेला व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे त्याची जिनोम सिक्वेन्स तपासणी करण्यात येत आहे. सध्या त्याला सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्याच्या संपर्कातील लोकांचीही तपासणी केली जात आहे, असं पेडणेकर यांनी सांगितलं. हाय रिस्क कंट्रीतून आलेल्यांची बॅक हिस्ट्रीही तपासली जात आहे. ओमायक्रॉनचा फैलाव होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार

