Mumbai ST Bank : हाताला लागेल त्याची फेकाफेक अन्… एसटी बँकेच्या बैठकीत सदावर्ते अन् शिंदे सेना भिडली, सदस्यांचा आरोप काय?
मुंबईतील एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तुफान राडा झाला. व्हिडिओ रेकॉर्डिंगवरून सुरू झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. सदावर्तेंनी बाहेरून लोक आणल्याचा आरोप करत एसटी कामगार सेनेने ३० कोटींच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणाची नागपाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मुंबईतील वाहतूक भवनात असलेल्या एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या बैठकीत सदावर्ते आणि शिंदेंच्या सेनेच्या संचालकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. बैठकीत चित्रीकरण करण्यावरून हा वाद सुरू झाला, मात्र लवकरच त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या दरम्यान संचालकांनी एकमेकांवर वस्तू फेकल्याचे सांगण्यात आले.
एसटी कामगार सेनेचे संदीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला पूर्वनियोजित होता. सदावर्तेंच्या गटाने बाहेरून लोक, तसेच महिला आणल्याचा आरोप त्यांनी केला. संचालक मंडळाच्या बैठकीत ३० कोटी रुपयांच्या डेटा सेंटर भ्रष्टाचारावर प्रश्न विचारले जात असताना हा प्रकार घडला. बाहेरून आलेल्या लोकांनी हल्ल्यात भाग घेतल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असल्याचा दावा शिंदे यांनी केला. नागपाडा पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Published on: Oct 15, 2025 05:13 PM
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
