मलिकांच्या राजीनाम्यासाठी झिरवळांची सही
विरोधकांनी जोरदार टीका आणि आरोप करत मलिकांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना घ्यावा अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे यासाठी विरोधकांनी विधासभेच्या पायऱ्यांवर सह्यांची मोहिमही राबवण्यात आली.
अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असतानाच या अधिवेशनात चर्चेचा विषय झाला आहे तो म्हणजे नवाब मलिक यांचा राजीनामा. विरोधकांनी जोरदार टीका आणि आरोप करत मलिकांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना घ्यावा अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे यासाठी विरोधकांनी विधासभेच्या पायऱ्यांवर सह्यांची मोहिमही राबवण्यात आली. या सह्यांच्या मोहिमेत सत्ताधारी पक्षातीलच आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सही केली. विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार पणे घोषणाबाजी करत विरोधक थांबले असताना उपाध्यक्ष झिरवळ यांना सह्या करण्यास काही आमदारांनी भाग पाडले त्यानंतर ही गोष्ट त्यांना ज्यावेळी समजली तेव्हा मात्र त्यांनी डोक्यावर हात मारुन केलेल्या सहीबद्दल ज्या भावना होत्या त्या त्यांनी न बोलताच व्यक्त केल्या.
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
