AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कन्नड बाजार समितीत संजना जाधव यांचा हर्षवर्धन जाधव यांना दे धक्का

कन्नड बाजार समितीत संजना जाधव यांचा हर्षवर्धन जाधव यांना दे धक्का

Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Apr 29, 2023 | 2:53 PM
Share

Agricultural Produce Market Committee Election Result 2023 : कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज निकाल लागतोय. छत्रपती संभाजीनगरमधील निकाल आता समोर आलाय...

छत्रपती संभाजीनगर : कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज निकाल लागतोय. छत्रपती संभाजीनगरमधील निकाल आता समोर आला आहे. कन्नड बाजार समितीत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना मोठा धक्का बसला आहे. संजना जाधव यांनी हर्षवर्धन जाधव यांचा पराभव केलाय. संजना जाधव आणि नितीन पाटील पॅनलचे 15 सदस्य विजयी झालेत. तर हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलच्या सर्वच सदस्यांचा धुव्वा उडाला आहे. कन्नड बाजार समितीवर शिंदे गट आणि संजना जाधव पॅनलने झेंडा फडकवला आहे. 18 पैकी 15 जागांवर त्यांनी विजय मिळवला आहे. संजना जाधव यांच्या पॅनलने हर्षवर्धन जाधव पॅनलला धूळ चारली आहे. कन्नड बाजार समितीत हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलचा सुफडा साफ झालाय.

Published on: Apr 29, 2023 02:53 PM
Follow Us