AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गिरणी कामगारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, लवकरच मिळणार आनंदाची बातमी

गिरणी कामगारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, लवकरच मिळणार आनंदाची बातमी

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Aug 21, 2023 | 6:29 PM
Share

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गिरणी कामगारांसाठी मोठी आणि महत्त्वाची घोषणा, महाराष्ट्र सरकार लवकरच गिरणी कामगारांसाठी 500 घरांची सोडत काढणार आणि गिरणी कामगारांना फक्त मुंबईतच नाही तर त्यांना त्यांच्या गावाजवळ, तालुक्याजवळही घर घेता येणार

मुंबई, २१ ऑगस्ट २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गिरीणी कामगारांसाठी मोठी घोषणा केली. आज गिरीणी कामगारांसाठी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना म्हणाले, ‘ महाराष्ट्र सरकार लवकरच गिरणी कामगारांसाठी 500 घरांची सोडत काढणार, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी त्यांनी गिरणी कामगारांच्या मागणीकडे आपण गांभीर्याने पाहत असल्याचं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. विशेष म्हणजे त्यांनी गिरणी कामगारांना फक्त मुंबईतच नाही तर त्यांना त्यांच्या गावाजवळ, तालुक्याजवळही घर घेता येईल’. तर पुढे ते असेही म्हणाले, अनेक गिरणी कामगार घरापासून वंचित राहिले ही वस्तुस्थिती आहे. मुंबईच्या जडणघडणीत गिरणी कामगारांचा वाटा सिंहाचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारने अतिशय गांभीर्याने गिरीणी कामगारांना घरं देण्याचा निर्णय घेण्याबाबतचं ठरवलं आहे.

Published on: Aug 21, 2023 06:29 PM
Follow Us