आझाद मैदानात रावणदहन दसऱ्यालाच होणार, मग शिंदे गटाचा दसरा मेळावा कुठे होणार?
VIDEO | उद्धव ठाकरे यांचा मेळावा शिवाजी पार्क तर एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार आहे. मात्र शिंदेंचा मेळावा यंदा आझाद मैदानावर असल्याने दसऱ्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे नवमीलाच रावण दहन करण्याचं फर्मान राज्य सरकारने काढल्याची टीका विरोधकांनी केली.
मुंबई, २२ ऑक्टोबर २०२३ | उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आझाद मैदान येथे होणार आहे. शिंदे गटाचा मेळावा यंदा आझाद मैदानावर असल्याने दसऱ्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे नवमीलाच रावण दहन करण्याचं फर्मान राज्य सरकारने काढल्याची टीका विरोधकांकडून होतेय, तर याला काँग्रेसकडून विरोध दर्शवण्यात आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आता मुंबईच्या आझाद मैदानातील रावणदहन हे दसऱ्याच्या दिवशीच होणार असल्याची माहिती समोर येतेय. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा कुठे होणार? याबाबत चर्चा सुरू झालीये. रामलीला आयोजकांनी रावणदहनासाठी मुंबईतील क्रॉस मैदानात जागा घेतली आहे. त्यामुळे क्रॉस मैदानात जागा मिळाल्याने रावणदहन दसऱ्यालाच होणार आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी आझाद मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होणार आहे.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...

