धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? साताऱ्यातील सभेतून एकनाथ शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होतेय. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता नेमकी कोणाला साथ देणार याकडे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उमेदवारांसाठी राज्यभरात प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली आहे. आज ते साताऱ्यात बोलत होते.
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची नाहीत तर ते बाळासाहेब ठाकरें यांची आहेत. तसंच घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांचे अपत्य आहेत, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कालच्या सभेत म्हटलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात होत असलेल्या भरसभेतून प्रत्युत्तर दिलं. एकनाथ शिंदे म्हणाले, जनतेने शिवसेना आणि भाजपची युतीचं सरकार येईल त्याप्रमाणे जनतेने मतदान केलं आणि निवडून दिलं, मात्र खुर्चीसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तोडून-मोडून टाकण्याचं काम केलं, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, काही लोकं म्हणालेत शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे आणि बाळासाहेबांचंच धनुष्यबाण आहे. खरंय शिवसेना आणि धनुष्यबाण हे शिवसेनेचंच आहे. पण ज्याने ते गहाण टाकलं होतं ते आम्ही सोडवलं आणि आज अभिमानाने आम्ही धनुष्यबाण आमचं असल्याचं म्हणतोय, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंनी सभेतून केलेल्या टीकेवर नाव न घेता प्रत्युत्तर दिलं.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक

