AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar | मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या बैठकीला अनुपस्थित, अजित पवार म्हणतात...

Ajit Pawar | मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या बैठकीला अनुपस्थित, अजित पवार म्हणतात…

| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 15, 2022 | 3:00 PM
Share

देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गैरहजरी हा राज्यातील चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गैरहजरी हा राज्यातील चर्चेचा मुद्दा ठरला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीदेखील आज पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गेल्या अनेक दिवसांपासून जाहीर कार्यक्रम, बैठकांमध्ये सहभागी झालेले नाहीत. तसेच विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी उपस्थिती लावली नाही. शुक्रवारी झालेल्या पंतप्रधानांसोबतच्या कोरोना आढावा बैठकीतही ते उपस्थित नव्हते.

गैरहजेरीवर काय म्हणाले अजित पवार?

पंतप्रधानांच्या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर राहिले यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘ प्रत्येक वेळी मीटिंगला प्रत्येकानेच उपस्थित राहणे आवश्यक नसते. कुणाची काही अडचण असू शकते. कुणी कोरोनामुळे क्वारंटाइन असतं. मात्र पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सीताराम कुंटे, दिलीप चक्रवर्ती आदी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी राज्यातील लसीकरणाविषयीची समस्या मांडली. 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रांकडे येत आहेत. मात्र लसीचे डोस कमी पडत आहे. हा पुरवठा वाढवण्यासंबंधीची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली. तसेच साठ वर्षांपुढील व्यक्तींनी बूस्टर डोस घ्यावा, असं सांगितलं जातंय, त्याकरिताही केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली.

Published on: Jan 15, 2022 02:32 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या