गिरीश महाजन यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांचा पलटवार; म्हणाले, ‘महाजनांच्या २० पिढ्या आल्या तरी…’
VIDEO | काँग्रेस पक्षात मोठी फूट पडणार असल्याचे गिरीश महाजन यांचे संकेत, गिरीश महाजनांचं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांच्या लागलं जिव्हारी, विजय वडेट्टीवार यांनी काय दिलं प्रत्युत्तर?
मुंबई, २६ ऑगस्ट २०२३ | एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. सर्व पक्ष तर मला इथेच दिसत आहेत, जे असतील नसतील ते, कुणी सुटलेलं नाही. शिवसेना आहे, आम्हीपण आहोत, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, आता काँग्रेसपण येईल, पण काँग्रेसला सध्या थांबलेलं आहे, असं भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले. गिरीश महाजन यांनी केलेलं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या चांगल्याच जिव्हारी लागलं आहे. यानंतर विजय वडेट्टीवार यांनी गिरीश महाजन यांना खोचकपणे प्रत्युत्तर देखील दिले आहे. गिरीश महाजन यांच्या वक्तव्याला विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मुंगेरीलाल के हसीन सपने, तशी गोष्ट आहे. गिरीश महाजन काय, गिरीश महाजनांच्या 20 पिढ्या आल्या तरी राज्यात काँग्रेसला फोडू शकणार नाहीत एवढं दाव्यावने मी सांगतो”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
Published on: Aug 26, 2023 08:59 PM
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
