AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 वर्षांवरील मुलांना मिळणार कोरोनाची लस, वृद्धांना बुस्टर डोस; सरकारचा मोठा निर्णय

12 वर्षांवरील मुलांना मिळणार कोरोनाची लस, वृद्धांना बुस्टर डोस; सरकारचा मोठा निर्णय

| Edited By: | Updated on: Mar 14, 2022 | 4:28 PM
Share

कोरोना व्हायरसपासून (Corona Virus) वाचण्यासाठी आता एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 16 मार्च पासून 12 ते 14 वयोगटातील बालकांना व्हॅक्सिन (Vaccine) देण्यात येणार आहे. 12 ते 14 वयोगटातील बालकांना आता Corbevax व्हॅक्सिन दिले जाणार आहे.

कोरोना व्हायरसपासून (Corona Virus) वाचण्यासाठी आता एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 16 मार्च पासून 12 ते 14 वयोगटातील बालकांना व्हॅक्सिन (Vaccine) देण्यात येणार आहे. 12 ते 14 वयोगटातील बालकांना आता Corbevax व्हॅक्सिन दिले जाणार आहे. Corbevax हे Biological E Limited या कंपनीने तयार केले आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी आता अनेक उपाय करण्यात येत असले तरी आता एक चांगली गोष्ट समोर आली आहे.16 मार्च पासून 12 ते 14 वयोगटातील बालकांना व्हॅक्सिन देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister) यांनी दिली आहे. बालकांसाठी हा निर्णय घेतल्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना आता बूस्टर डोस देण्यात आला आहे. या आधी भारतात फक्त आरोग्य विभागाचे कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स आणि ज्या नागरिकांच वय 60 वर्षापेक्षा अधिक आहे आणि ज्यांना comorbidity आहे, त्यांनाच फक्त बूस्टर डोस देण्यात येत होता.