Cylinder Blast | वरळीत सिलेंडर स्फोट, स्फोटात 4 जण जखमी
मुंबईत वरळी येथे आज आगीची एक भयानक घटना घडली. वरळीतील बीबीडी चाळीत एका घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट (Cylinder blast) झाला. या स्फोटात एका चार महिन्याच्या बाळासह चारजण होरपळ्याची माहिती आहे.
मुंबईत वरळी येथे आज आगीची एक भयानक घटना घडली. वरळीतील बीबीडी चाळीत एका घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट (Cylinder blast) झाला. या स्फोटात एका चार महिन्याच्या बाळासह चारजण होरपळ्याची माहिती आहे. जखमींना तात्काळ नायर रुग्णालयात (Nair Hospital) दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.
वरळीतील कामगार वसाहत येथील बीडीडी चाळ क्रमांक 3 मधील एका घरात आज सकाळी 7 वाजून 11 मिनिटांनी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सिलेंडरच्या स्फोटानंतर आगीचा भडका उडाला. त्यामुळे संपूर्ण घराला आग लागली. आगीची घटना कळताच तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग लेव्हल 1 ची असल्याची माहिती आहे.
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ

