AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरोग्य विभागाला 'डाग' लावणारा प्रकार! बत्तीगुलचा फटका? प्रसुती झालेल्या माताही लाईटच्या प्रतिक्षेत

अरोग्य विभागाला ‘डाग’ लावणारा प्रकार! बत्तीगुलचा फटका? प्रसुती झालेल्या माताही लाईटच्या प्रतिक्षेत

aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Jun 05, 2023 | 8:02 AM
Share

तेथे प्रसुती झालेल्या मातांचे. नागपुरातील डागा रुग्णालयात हा प्रकार समोर आला आहे. काल येथे तब्बल दीड तासांपासून बत्तीगूल होती. त्यामुळे येथील प्रसुती वॉर्ड हा अंधारात गेला होता.

नागपूर : बत्तीगुलचा फटका अनेक ठिकाणी बसताना पहायला आणि ऐकायला मिळत आहे. वाढती गर्मी आणि त्यात लाईट नसल्याने अनेकांचे हाल होतात. मात्र धक्कादायक म्हणजे हे हाल रूग्णालयात झाले. तेथे प्रसुती झालेल्या मातांचे. नागपुरातील डागा रुग्णालयात हा प्रकार समोर आला आहे. काल येथे तब्बल दीड तासांपासून बत्तीगूल होती. त्यामुळे येथील प्रसुती वॉर्ड हा अंधारात गेला होता. यावेळी येथे 100 पेक्षा जास्त जन्मजात बालके आणि माता होत्या. याचदरम्यान गर्मी आणि वीज गेल्यामुळे प्रसुती झालेल्या मातांना बाळाला घेऊन बाहेर बसण्याची वेळ आली. इतकचं काय तर यामुळे उपचारावरंही त्याचा थेट मोठा परिणाम. यावेळी उपचाराअभावी लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याय कोण जबाबदार? असा सवाल उपस्थित नातेवाईक आणि रूग्णांनी उपस्थित केला.

Published on: Jun 05, 2023 08:02 AM
Follow Us